जलसंपदामंत्री ना.गिरीष भाऊंनी पाडळसरे धरणाला एक हजार कोटी रु त्वरीत द्यावे..!
अमळनेर(प्रतिनिधी)पाडळसरे धरण संघर्ष समितीच्या साखळी उपोषण आंदोलन दुसऱ्या दिवस राजकिय व सामाजिक पदाधिकारी व पाठिंबा देणाऱ्यांच्या भरघोस उपस्थितीने जोरदार गाजले.
“जिल्ह्याचेच जलसंपदा मंत्री ना.गिरीषभाऊ यांनी पाडळसरे धरणाला एक हजार कोटी रु. त्वरित द्यावेत! खोटे आश्वासन देणाऱ्यांना लोकसभा निवडणुकीत जागा दाखवा!
“असे आवाहन मा.मंत्री.गुलाबराव देवकर यांनी आंदोलनास पाठींबा देतांना केले.
आंदोलन स्थळी मोठ्या संख्येने दिवसभर नागरिकांची वर्दळ वाढलेली आहे. दुसऱ्याच दिवशी आंदोलनात सहभागी होणाऱ्या नागरिकांमुळे आंदोलनाची तिव्रता वाढत आहे.अमळनेर तालुक्यासह चोपडा,धरणगाव,पारोळा येथिल राजकीय व सामाजिक कार्यकर्त्यांनीही उपस्थिती लावून धरणाच्या प्रश्नाचे गांभिर्य व व्याप्ती वाढविली आहे. आज मा.मंत्री.आ.सतिष पाटिल यांचे सह राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस विलास पाटील यांनी ही पाठींबा देत सांगितले की, ” धरण पूर्ण करू असे सांगत निवडून गेलेल्या भाजप सरकारने अमळनेरकरांच्या तोंडाला पाने पुसली ! असा घणाघात केला.तर संघर्ष समितीच्या वतीने सुभाष चौधरी यांनी आंदोलनाची भूमिका विशद करतांना,”आंदोलन समिती ही निरपेक्ष कार्य करीत असून जो धरण पूर्ण करेल तो आमचा मायबाप असेल!” असे सांगितले.
याप्रसंगी राष्ट्रीय किसान मोर्चा अमळनेर मराठा महिला मंडळ, अमळनेर महिला मंच ट्रस्ट,नागरी हित दक्षता समिती,युथ सेवा समिती फाउंडेशन, वकील असोसिएशन अमळनेर व धरणगाव,अमळनेर मेडिकल असोसिएशन ,नगरपरिषद वाहन चालक संघटना आदिंसह अनेक संघटनांच्या प्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे पाठिंबा देत सक्रिय सहभाग नोंदविल्याने आंदोलनाची तिव्रता वाढली आहे.
आजच्या आंदोलनाप्रसंगी मा.आ.कृषिभूषण साहेबराव पाटील, मा.कुलगुरू शिवाजीराव पाटिल, सौ.तिलोत्तमा पाटील,प्रा.अशोक पवार, सौ.आशा शिंदे,श्याम अहिरे, सौ.प्रतिभा पाटिल,अड. तिलोत्तमा पाटिल, एस.एम.पाटील, अड.ए.एन. बोरसे, शिवाजी दौलत पाटील, रणजित शिंदे, पी.एस.आबा पाटिल,किसान मोर्चा चे हिरालाल पाटीलआदिनी आंदोलनास दिवसभर संबोधित केले.
आज उपोषण आंदोलनात आज नगराध्यक्षा सौ.पुष्पलता पाटील, डॉ.अपर्णा मुठे,सौ.सरोज भांडारकर,प्रा.जयश्री दाभाडे, सौ.माधुरी पाटील,सौ.कांचन शहा,सौ.भारती पाटील,सौ.सुलोचना वाघ, श्रीमती आशा चावरिया, प्रा.शिला पाटिल, सौ.पौर्णिमा कुलकर्णी, सौ.चंदा वैद्य,सौ.सोनिया भावसार,सौ.के.ए. गरूड, सौ.भावना देसले,प्रबोधिनी सोनवणे, सौ.सुशीला वाघ यांच्यासह अमळनेर वकील संघाचे पदाधिकारी ऍड.किशोर बागुल,ऍड. राजेंद्र निकम,अड.राजेंद्र चौधरी,अड.आर.आर.पाटिल,अड.आर.एस.भदाणे
धरणगाव वकील संघाचे ऍड. वसंत भदाणे यांनी वकील बांधवांसह उपस्थिती देत पाठिंबा दिला.तर किसान मोर्चा चे हिरालाल पाटील,विश्वास पाटील मुस्लिम सामाजिक संघटनेचे रियाज मौलाना,नावेद शेख,शराफत मिस्तरी, अमजद अली शहा,कुदरत अली,नाविद शेख, इकबाल कुरेशी,अश्फाक शेख, हाजी सत्तार शे,ग्रामिण भागातील मंगरूळ,चौबारी येथिल महिला तर चिमनपुरी पिंम्पळे ,अटाळे गावाचे पदाधिकारी दिवसभर “धरण पूर्ती झालीच पाहिजे! “घोषणा देत उपस्थित राहिले. आंदोलन समितीचे प्रा.गणेश पवार, योगेश पाटिल,महेश पाटिल, आर.बी.पाटील, सुनिल पाटिल, प्रशांत भदाणे, एस.एम.पाटिल, देविदास देसले, रणजित शिंदे, सतीश काटे,डी. एम.पाटील,रामराव पवार,देविदास देसले,दिलिप पाटील आदिंसह मोठ्यासंख्येने कार्यकर्ते उपोषनास बसलेले होते.