
अमळनेर( प्रतिनिधी) अमळनेर येथिल सरस्वती विद्या मंदिर तर्फे शिवजयंती निमित्त छ. शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याच पूजन करून शिवजयंती साजरी करण्यात आली.
सरस्वती विद्या मंदिर चे मुख्याध्यापक रणजित शिंदे यांनी नाट्यगृह येथिल छ. शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्प अर्पण करून वंदन केले.तसेच उपशिक्षक आनंदा पाटिल, सौ.संगीता पाटिल, सौ.गीतांजली पाटिल, परशुराम गांगुर्डे, धर्मा धनगर,ऋषिकेश महाळपूरकर आदि शिक्षकांनीहि पुष्प अर्पण करून पूजन केले.