कै.काकासाहेब राणे व कै.विजयाबाई लढे-नाटयगृह व वसतिगृह नामकरण समारंभ

शिक्षण हे सर्वांगीण असावे-पद्श्री ना.धो.मनोहर यांचे प्रतिपादन

अमळनेर: प्रताप महाविद्यालयातील नाट्य गृह सभागृहात रविवारी कै.शंकरराव राणे व कै.विजयाबाई लढे यांच्या स्मरणात नाट्यगृह -विद्यार्थी वसतिगृह नामकरण उदघाटन समारंभ मोठया उत्साहात संपन्न झाला.या प्रसंगी पदश्री कवी ना.धो.महानोर,प्रसिध्द सिने अभिनेते रविन्द्र मंकणी, प्रकाशजी पाठक,दिलिप रामु पाटील (व्यवस्थापन परिषद सदस्य),अनिल कदम (अध्यक्ष,खा.शी.मण्डल) निरज अग्रवाल(कार्याध्यक्ष ),प्राचार्या डॉ राणे मैडम या सर्वांनी दिप प्रज्वलन आणि सरस्वती देवी,पूज्य साने गुरुजी,दानशुर प्रताप शेटजी यांच्या प्रतिमेचे पूजन केले.
या प्रसंगी व्यासपीठावर प्रमुख मान्यवरासह खा.शी. मण्डलाचे सर्व जेष्ठ संचालक डॉ बी एस पाटील,मा.हरि भिका वाणी,डॉ संदेश गुजराथी, निरज अग्रवाल, जितेन्द्र जैन( कार्यापाध्यक्ष ),योगेश मुंदडे,कल्याण पाटील, प्रदीप अग्रवाल,सौ.वसुंधरा ताई लांडगे,सौ.माधुरी ताई पाटील, कमल कोचर,राणे काका,अरुण लढे,सौ.मंकणी,प्राचार्या डॉ राणे उपस्थित होते.
समारंभाच्या प्रारंभी पुलवामा येथे शहीद झालेल्या जवानाना श्रद्धांजली अर्पण करन्यात आले आणि त्या नंतर निरज अग्रवाल यांनी प्रस्तुत कार्यक्रमाचे प्रयोजन आणि महाविद्यालयाची शैक्षणिक वाटचाल सभेपुढे सांगीतले.या नंतर स्वागत गीत वसुंधरा ताई लांडगे यांनी म्हटले.
सुरुवातीस प्रमुख अथिती यांचा परिचय प्रा.नितिन पाटील,प्रा धिरज वैष्णव,प्रा एस बी नेरकर यांनी करुन दिला त्या उपरांत सर्व मान्यवर व प्रमुख दाते यांचा यथोचित सत्कार खा.शी.मंडळ पदाधिकारी यांच्या मार्फत करण्यात आले.
सुरुवातीस मा अरुण लढे,सुहास राणे यांनी मनोगत व्यक्त केले.या प्रसंगी मा.राणे यांनी आपल्या भावनाना वाट मोकळी करुन दिली; त्यांनी कृतज्ञनता भाव व्यक्त केले. प्रकाश पाठक यांनी हा समारंभ म्हणजे धन संस्कार आहे,समृद्धी ही आता विद्याप्रणव होत आहे, विद्याधन हे परिश्रमाने प्राप्त व्हावे, या करिता साधना महत्वाची आहे म्हणुन साधनेचा असा अखंड प्रवास निरंतर सुरु रहावा असे मत व्यक्त केले.
दिलिप रामु पाटील यांनी अध्यक्ष स्थाना वरुन संवाद साधताना असे म्हणाले की,या कार्यक्रमाने समाजाचा शिक्षण शेत्रा वरील विश्वास अधिक पक्का होईल.प्रताप शेटजी ने पाच दालने जगाला दिली. उद्योग,आरोग्य,तत्वज्ञान,शिक्षण व अध्यात्मया समारंभाचे उदघाटक पदश्री रान कवी मा.ना.धो. महानोर यांनी सभेला संबोधित केले.ते म्हणाले की,विद्यार्थी-विद्यार्थ्यानी कल्पना विलासात जगु नये तर प्रत्यक्ष अनुभवातुन जगावे.आज शिक्षणा शिवाय पर्याय नाही,महात्मा फुले,महश्री कर्वे,महाराज सयाजीराव गायकवाड़,डॉ बाबासाहेब अम्बेडकर,गोविंद भाई श्राफ,विवेकानंद यांनी अथक परिश्रम केले.या सर्वांचा विचार व्यापक होता.सर्वांना कवेत घेउन जाणारे शिक्षण पाहिजे. अर्थात, सर्वांगीण शिक्षण ही आजची गरज आहे .या प्रक्रियेत साधना फार महत्वाची आहे ; विद्यार्थ्यांनी ग्रंथाचे व्यसन करणे आवश्यक आहे. प्रताप कॉलेज ही ज्ञानाची पंढरी आहे ; भगवंत म्हणजे रसिक होय.महानोर यांनी सभेला आपले अनुभव सांगितले.
प्रस्तुत समारंभास डॉ बी आर बाविस्कर, भास्कर अप्पा,विनोद राजधर पाटील,कुन्दन अग्रवाल,मा बजरंगजी अग्रवाल,डॉ नरेन्द्र सोनवणे,अनिल भाईदास पाटील, ललिता पाटील,उदय बापू वाघ,रविन्द्र चौधरी,पण्डित चौधरी,अजय केले,डॉ ओसवाल,वसंत बापू पाटील,डॉ करमपुरवाला,प्रशान्त सिंघवी,पंकज मुन्दडे,डॉ मिलिन्द नवसारी,संदीप सराफ,रोटरी क्लब,लायन्स क्लब,वकील संघ,फ़ार्मसी चे प्राचार्य-शिक्षक व शिक्षकेत्तर वर्ग,खा.शी. मंडळाचे सर्व शिक्षक- प्राध्यापक-प्राध्यापिका-शिक्षकेत्तर वर्ग,सर्व उप-प्राचार्य,सी डी सी सदस्य,प्राध्यापक प्रतिनिधी यांच्या सह शहरातील विविध मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाप्रसंगी सूत्रसंचालन डॉ माने यांनी केले तर चिटणीस डॉ ए बी जैन यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *