
अमळनेर: महाराष्ट्रातील साहित्यिकांचा काव्य महोत्सव,काव्यप्रेमी शिक्षक मंचने नवापूर येथे आयोजित केला होता.
हा महोत्सव दोन दिवस चालला प्रथम दिवशी काही कवींनी सहभाग घेतला त्यात बेटावद येथील प्रियदर्शिनी इंदिरा गांधी कनिष्ठ महाविद्यालयचे प्राध्यापक पी.के. पाटील यांच्या “माय” नावाच्या कवितेने गाऊन रसिकांना दाद देऊन गेली.ही कविता खान्देश राणी अहिराणी जया नेरे संपादित पुस्तकात त्याच ठिकाणी प्रकाशित करण्यात आले. माय नावाच्या कवितेला सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र देऊन प्रा,पी के पाटील यांना सन्मानित करण्यात आले. प्रा,पाटील हे भिलाली ता.अमळनेर येथील रहिवासी आहेत ,त्यांचे अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघटना, शिक्षक संघटना, माजी आमदार कृषिभूषण साहेबराब पाटील, तसेच मित्र परिवाराकडून विविध,व स्तरातून अभिनंदन होत आहे.