खळेश्वर भागातील स्मशानभूमीची पडदी कोसळली

अमळनेर(प्रतिनिधी) अमळनेर शहरातील खळेश्वर भागातील स्मशानभूमि ची पडदी व बीम अचानक कोसळल्याची घटना  १६ रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली त्यात जीवित हानी झाली नाही.
     पदडीचा स्लॅब टाकायला चार दिवस झाले तेवढ्यात तेथील काही लोकांनी सेंटरिंग्जच्या पाट्या व आधार काढून घेतल्याने स्लॅब पडला तर नगरपरिषदेतील विरोधकांनी व माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता स्मशान भूमीचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाले असल्याचा आरोप केला आहे. तर ठेकेदाराने याबाबत सांगितले की अज्ञात व्यक्तींनी आधाराला लावलेल्या दांड्या चोरून नेल्याने काम पक्के होण्यापूर्वी भार सहन न झाल्याने पडदी पडली स्मशान भूमीचे काम वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून होत असून कार्यान्वित यंत्रणा सार्वजनिक बांधकाम खाते आहे सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपकार्यकारी अभियंता सुभाष सूर्यवंशी,अभियंता वारुळे यांनी भेट दिली असता या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येईल असे खबरीलाल शी बोलतांना सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *