व्यायामशाळा,सभामंडप व कॉंक्रिटीकरणाचा समावेश,गावात उल्लेखनीय विकास कामे झाल्याने ग्रामस्थांमध्ये कौतुक
अमळनेर(प्रतिनिधी)अमळनेर विधानसभा मतदार संघात असलेल्या पारोळा तालुक्यातील जिराळी येथे अत्याधुनिक व्यायामशाळा इमारत,व्यायाम साहित्य, मारुती मंदिराचा सभामंडप आदी विकास कामांचे लोकार्पण तसेच काँक्रीटरस्ताचे भूमीपूजन आ शिरीष चौधरींच्या हस्ते करण्यात आले.
आ शिरीष चौधरी यांनी सुरवातीपासूनच अमळनेर मतदार संघात असलेल्या पारोळा तालुक्यातील 41गावांवर विशेष लक्ष देऊन समान न्यायाची भूमिका घेतलेली आहे, सुमारे 55 लाख निधीतून जिराळी ते इंधवे या दोन गावांना जोडणारा पूल, 1 कोटी 25 लाख निधीतून जिराळी ते बहादरपूर रस्ता, तसेच जिराळी येथे हायमॅक्स लॅम्प, नाला खोलीकरण आदी कामे आमदारांनी केले असून याव्यतिरिक्त बोरी वरील बाधाऱ्यांसह इतर गावांमध्ये देखील उल्लेखनीय विकासकामे झाली आहेत, यामुळे ग्रामस्थांनी यावेळी समाधानाची भावना व्यक्त करत आ चौधरींचे विशेष आभार व्यक्त केले.याप्रसंगी गटनेते प्रवीण पाठक, मा. उपनगराध्यक्ष आबु महाजन, नगरसेवक बाळासाहेब सदांनशीव,पंकज चौधरी, जीराळी सरपंच संभाजी पाटील,भोलाने सरपंच चतुर पाटील, पिंपळकोठे सरपंच महेंद्र पाटील, माजी सरपंच चंद्रकांत खैरनार, गोविंदा पाटील, संभाजी पाटील, रमेश पाटील,नामदेव पाटील, गोविंद पाटील,बन्सीलाल पाटील, पोलीस पाटील भाऊसाहेब पाटील, योगेश चौधरी,किशोर शिंदे, मोतीराम बोरसे, निबा पवार,बटाऊ खैरणार,प्रवीण पाटील,किशोर पाटील,भिवन पाटील, कैलास पाटील, सुभाष पाटील, मोहन पाटील,भरत पाटील, गणेश पाटील, बापू पाटील,निबा भिल,भैय्या पाटील,भोला पाटील,बाळू पाटील,प्रल्हाद पाटील,संजय पाटील,प्रकाश पाटील,लोटन सोनवणे,अतुल बोरसे,यशवंत पाटील,दिलीप पाटील, ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.