जम्मू काश्मीरमधील पुलवमा येथील दहशतवादी हल्ल्यात ४४ जवान शहीद झाले,त्यांना संपूर्ण देशभरात वीरांजली वाहीली जात असून दहशतवाद्यांचा निषेध व्यक्त केला जात आहे.
काल रोजी चोपडा तालुक्यातील घुमावल येथील नवरदेव प्रसाद पाटील यांचे राजवड येथील माजी आमदार कृषिभूषण साहेबराव दादा पाटील यांच्या पुतण्या ची मुलगी म्हणजे कृषिभूषण दादांची नात भाग्यश्री पाटील यांचा पूर्व नियोजित विवाह समारंभ शहरातील अंबिका मंगल कार्यालयात होता, त्यांच्या आयुष्यातील आनंदाचा क्षण होता,मात्र देशात जवानांवर दुर्दैवी घटना घडली, म्हणून उभयतांनी आपला आनंदाचा क्षण विसरून विवाहाप्रसंगी बँड चा गाजा वाजा न वाजता व फटाके न फोडता विवाह साध्या पद्धतीने करुन एक आगळीवेगळी श्रद्धांजली शहिद जवानांना अर्पण करून समाजासमोर आदर्श निर्माण केला.भारत मातेच्या वीर सुपुत्रांना भावपुर्ण विरांजली.