अमळनेर येथील विजयनाना पाटील आर्मी स्कुल मध्ये पुलवामा येथे काल सीआरपीएफ जवानांवर दहशतवादीनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी छोट्या जवानांनी मानवी साखळीने “HATE” हा शब्द तयार करून तीव्र निषेध व्यक्त केला. त्यानंतर शहिद जवानांना प्राचार्य पी एम कोळी व सुभेदार मेजर नागराज पाटील यांनी पुष्पचक्र अर्पण केले. यावेळी हवालदार डी पी बोरसे, नायब सुभेदार भटू पाटील आदींसह शिक्षक, शिक्षिका व शिक्षेकतर कर्मचारी उपस्थित होते.शाहिद झालेल्या जवानांना दोन मिनिटे स्तब्ध राहून श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी सुभेदार मेजर नागराज पाटील, शरद पाटील यांनी हल्ल्याबाबत माहिती दिली. बंदूक धारी छोट्या जवानांनी शस्र सलामी देऊन आदरांजली वाहिली.