भ्याड हल्ला करणाऱ्या “हिजडा” पाकीस्तानचा जाहीर निषेध

शहरातील विविध संघटना पक्ष व नागरिक यांच्यावतीने शाहीदांना श्रद्धांजली अर्पण ; मूक मोर्चा काढून केला निषेध

अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर शहरातील जि.प. विश्रामगृहात येथे काश्मीर येथे आतंकवादी हल्ल्यात शाहिद झालेल्या जवानांना सामुदायिक वीरांजली अर्पण करण्यासाठी समाजातील सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी एकत्र येऊन वीरांजली अर्पण केली.तसेच छत्रपती शिवाजी नाट्य गृहपर्यंत मुकमोर्चा काढून या अमानुष घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला.

अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघटना,माध्यमिक शिक्षक संघटना, तालुका क्रीडा शिक्षक संघटना आदींनी हा कार्यक्रम आयोजित केला होता.आलेल्या प्रत्येकाने स्वतःची एक मेणबत्ती पेटवून वीरांजली अर्पण केली व भारतीय जवानांना बळ मिळण्याची प्रार्थना केली. प्रारंभी मुस्लिम विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत सादर केले. त्यानंतर सर्व राजकीय पदाधिकारी,संपूर्ण शहर संघटना, पक्ष यांच्यातर्फे प्रातिनिधीक स्वरूपात माजी आमदार डॉ बी एस पाटील यांनी श्रद्धांजलीपर मनोगत व्यक्त केले यात थेट तोडगा काढण्याचे आवाहन करत शासन जो निर्णय घेईल त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे असे भावनिक आवाहन त्यानी केले यावेळी भारत मातेच्या नावाने घोषणाबाजी करण्यात आली.विशेष म्हणजे यावेळी उपस्थित असलेल्या एका माजी सैनिकांच्या पत्नीस अश्रू अनावर झाले होते.

त्यानंतर विश्रामगृह ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापर्यंत मुकमोर्चा काढण्यात आला तेथे दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून श्रद्धांजली अर्पण केली त्यानंतर राष्ट्रगीताने समारोप करण्यात आला.यावेळी आ सौ स्मिता वाघ,आ शिरीष चौधरी,माजी आ कृषिभूषण साहेबराव पाटील,जिल्हा बँक संचालक अनिल भाईदास पाटील,सौ तिलोत्तमा पाटील,माजी नगराध्यक्ष विनोद पाटील, आदींसह राजकीय,सामाजिक व इतर क्षेत्रातील मान्यवर तसेच बोहरी व मुस्लिम समाज बांधव उपस्थित होते.यात खान्देश शिक्षण मंडळ,लायन्स क्लब,रोटरी क्लब,औषधी विक्रेता संघ,भारतीय जनता पार्टी,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,काँग्रेस आय,आ शिरिषदादा आघाडी,राजमुद्रा फाऊंडेशन,श्रम साफल्य एज्युकेशन सोसायटी,मार्केट अडत असो.,अमळनेर ठाकूर समाज, अमळनेर तालुका फोटोग्राफर संघटना,भारतीय कर्मचारी महासंघ,न प मजदूर महासंघ,डॉ बाबासाहेब आंबेडकर समाजीक परिषद,पी टी ए संघटना,अमळनेर मित्र परिवार,श्री शिवाजी गार्डन मॉर्निंग ग्रुप,अर्बन बँक संचालक मंडळ,भाजयुमो,आम्ही अमळनेर कर बहु संस्था,शिवसेना अमळनेर,राष्ट्रवादी शिक्षक सेल,गायत्री परिवार,अग्रवाल समाज,बोहरा समाज,जुनी पेन्शन संघटना,संभाजी ब्रिगेड,राजपूत एकता मंच,बी जे एस संघटना,ओसवाल जैन समाज,वकील संघ,प्राथमिक शिक्षक संघ,अर्बन बँक कर्मचारी संघटना,लायनेस क्लब,आधार संस्था,धंनदाई माता एज्यु सोसायटी,जनसेवा फाऊंडेशन,गोशाळा अमळनेर, उदयकाळ फाऊंडेशन,पाडळसरे धरण जनआंदोलन समिती,निमा संघटना आदीं संघटनांनी सह्भाग नोंदविला.
तर उर्दू गर्ल्स हायस्कुल च्या विद्यार्थिनी नसिरा नाज मो मुश्ताक,माहेनूर शेख तन्वीर व मसिरा आरिफ पिंजारी यांनी देशभक्तीपर गीत सादर केले.सामाजिक एकात्मतेचा संदेश देखील या कार्यक्रमातून मिळाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *