मंगरूळ विद्यालयात प्रेरणा संयम रॅली काढून केला निषेध

अमळनेर ( प्रतिनिधी) जम्मू काश्मीर मधील पुलवामा मध्ये आतंकवाद्यांनी केलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ व सामान्य जनतेतील भीती दूर व्हावी म्हणून तालुक्यातील मंगरूळ येथील कै दादासो अंबर राजाराम पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातर्फे “प्रेरणा- संयम ” रॅली काढण्यात आली
आतंकवाद्यांनी बॉम्ब हल्ला केल्यामुळे देशाचे ४४ सैनिक शहीद झाले अचानक घडलेल्या घटनेमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे या भीतीतून बाहेर पडण्यासाठी आणि जनतेने संयमाने लढा देण्यासाठी मुख्याध्यापक प्रकाश पाटील व माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष संजय पाटील यांनी रॅलीचे आयोजन केले होते माध्यमिक शाळेपासून , बसस्टॉप , ग्रामपंचायत , श्रीकृष्ण चौक , शनी दरवाजा , पिंपळे रस्ता या मार्गे रॅली काढण्यात आली यावेळी विद्यार्थ्यांनी “नही डरेंगे नही डरेंगे, अब बस मारेंगे” “भारत को जो ललकारेंगा, खाक हो जायेगा” “देश के जवानो हम बच्चे आपके साथ है” आदी प्रकारच्या घोषणा दिल्या आतंकवाद्यांनी केलेल्या हल्ल्याचा निषेध करून सामूहिक वीरांजली अर्पण करण्यात आली
यावेळी अशोक सूर्यवंशी , प्रभूदास पाटील , राजेंद्र पाटील , , जितेंद्र पाटील , मयूर पाटील , श्यामकांत पाटील , सुषमा सोनवणे,हजर होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *