बळीराजांच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्या बाजार समितीच्या व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश.!

अमळनेर (प्रतिनिधी )अमळनेर बाजार समितीत मुग विकलेल्या मालात हमीभावापेक्षा कमी भावात मुग खरेदी प्रकरण चांगलेच गाजत आहे. त्याची परिणीती बाजार समीतीतील १५ व्यापार्‍यांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश येथील प्रथम दंडाधिकारी वर्ग १ वाय जे वळवी यांनी दिले असून यामुळे व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. आदेशात ३० दिवसांच्या आत अहवाल सादर करण्याचे आदेश देखील न्यायालयाने दिले आहेत.  
याबाबत राष्ट्रीय किसान संघाचे अध्यक्ष व गावराणी जागल्या संघटनेचे कार्यकारी सदस्य अरुण बाबुराव देशमुख यांनी न्यायलयात धाव घेतली होती. उच्चतम दर्जाचा (एफ ए क्यू) माल असूनही त्याचा उडीद मूग हमी भावापेक्षा कमी भावाने खरेदी करण्यात आला होता. याबाबत तालुक्यातील गावरान जागल्या सेनेसह  शेतकऱ्यांनी सहाय्यक निबंधक व सचिवांकडे लेखी तक्रार केली होती. मात्र दखल न घेतली गेल्याने याबाबत दावा न्यायालयात दाखल केला होता.

हे असतील आरोपी.. –
भवलक्ष्मी तर्फे नितू हर्ष जैन, श्रद्धा तर्फे सुरेखा पूनमचंद छाजेड द्वारा रमेशचंद छाजेड,एच बी तर्फे हरी भिका वाणी, देवराज प्रसन्न बाफणा, निशांत तर्फे संगीता विजय पारख संपतलाल अगरचंद तर्फे हर्षकुमार प्रकाशचंद जैन, व्ही बी तर्फे विजय गुलाबचंद बाफणा, समर्थ तर्फे हेमलता देवराज बाफणा, नर्मदा तर्फे महेंद्र मोहनलाल जैन, साईकृपा तर्फे वृषभ प्रकाश पारख, ओमश्री तर्फे योगेश चूडामण शेटे, बी.टी. तर्फेशंकरलाल तेजुमल बितराई, लामा तर्फे विनोदकुमार कांतीलाल कोठारी,चितसीया तर्फ शेखर कॉसर अहमद शेख रोयाजोद्दीन भगवती तर्फे शंकरलाल तेजुमल बितराई, सर्व बाजार समितीतील परवानाधारक व्यापारी आहेत. भा.द.वि.कलम १९९, ४२०,४६४, ४६८, व ३४ प्रमाणे दावा दाखल केला होता त्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
काय आहे तक्र
ार –
बाजार समितीत विकतात. सन् २०१७-१८ च्या पावसाळी हंगामात निघालेल्या उडीद, मुंगास, फिर्यादीसह व इतर ह अन्य विविध गावातील शेतकऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्री केला असता सदरच्या उच्च प्रतिच्या उडीद व मुगास केंद्र शासनाने जाहीर केलेल्या किमान आधारभूत दराने म्हणजेचअनुक्रमे ५४००/- रु ते ५५७५- रु.प्रमाणे खरेदी करणे संबधीत आरोपी, आडतव्यापाऱ्यांवर बंधनकारक असतांनाही आरोपी नं.१ ते १५ यांनी सध्या १७००- ते ४५००- रुपये प्रति क्विट्ल दर सुरू आहे असा विश्वास देवून फसवणूकीने फिर्यादी व अन्य अनेक शेतकऱ्यांकडून सदर सर्व आरोपींनी उच्च प्रतिच्या शेतमालास अत्यंत कमी दराने खरेदी करून शेतकऱ्यांची संगनमताने फसवणूक केली आहे त्यासाठी त्यांनी सदर शेतकऱ्यांना सदर उच्च प्रतिच्या शेतमालास विश्वासघात करून फसवणूकीने खरेदी करतांना बोगस बिले सुध्दा तयार करून दिली आहेत. सदरच्या बिलांवर जर शेतमाल उच्च प्रतिचा नसेल व तो हलक्या प्रतिचाअसल्यास नोन एफएकयू असा शिक्का मारला जातो. मात्र फिर्यादी व इतर शेतकर्‍यांना नोन एफ ए क्यु चे शिक्के न मारता दर्जाचे कोणतेही शिक्के पावत्यांवर दिसून आले नाही त्यामुळे आडते आणि व्यापारी यांनी संगनमताने चांगल्या प्रतीचा हा नियमांनुसार एफएक्यु असतांना देखील किमान आधारभूत भाव न देता माल खरेदी केला. या प्रकरणी विविध ठिकाणी तक्रारी पाठपुरावा करूनही याबाबत शासकीय यंत्रणांनी कारवाई केली नाही. त्यामुळे फिर्यादी यांनी न्यायालयात धाव घेतली होती. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *