
अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर पंचायत समितीच्या
शिक्षण विभागाकडून समग्र शिक्षा अभियान अंतर्गत दिव्यांग विद्यार्थ्यांना साहाय्यक उपकरणे व साधने यांचे
वाटप केले.
या कार्यक्रमाप्रसंगी अध्यक्षस्थानी आमदारस्मिताताई वाघ होत्या. दिव्यांग विद्यार्थ्यांना कर्णयंत्र,व्हील चेअर, रोलेट, सी.पी. चेअर, ए.एफ.ओ. आदी साहित्य वाटण्यात आले. यावेळी पंचायत समिती
सभापती वजाबाई भिल,माजी सभापती किशोर अहिरे, माजी सभापती डॉ.दीपक पाटील, माजी जि.प.सदस्य ऍड व्ही.आर.पाटील, माजी जि.प.सदस्य संदीप पाटील,नाटेश्वर पाटील, राजू पवार,गटविकास अधिकारी अजय नष्टे,साहाय्यक गटविकास अधिकारी संदीप वायाळ, गटशिक्षणाधिकारी आर.डी.महाजन, तालुका समन्वयक विद्या मैलागीर,आदी उपस्थित होते. आणि विशेष शिक्षक अमोल पाटील, किशोर पाटील,रेखा वारडे, शीतल भदाणे यांनी परिश्रम घेतले.