लग्नाच्या तयारीतही वधूने मतदानाचा बजावला हक्क

अमळनेर (प्रतिनिधी) लग्नाच्या दोन दिवस आधी वधू रोशनी राजेंद्र भवसार हिने आपल्या आई ज्योती राजेंद्र भावसार आणि वडील राजेंद्र भावसार यांच्यासोबत मतदानाचा हक्क बजावला.  कर्तव्यपालनाचा संदेश देत मतदान हा लोकशाहीचा कणा आहे, हे दाखवून दिले.

अमळनेर येथील भावसार कुटुंबातील रोशनीचा विवाह २२ नोव्हेंबर रोजी ठरलेला असून, लग्नाच्या तयारीची धावपळ असतानाही कुटुंबाने आपली सामाजिक जबाबदारी ओळखून मतदान केंद्र गाठले. वधू रोशनी हिने आपल्या पालकांसोबत मतदानाचा हक्क बजावत लोकशाही प्रक्रियेत आपला सहभाग नोंदवला.

“लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येकाने आपले कर्तव्य पार पाडले पाहिजे. मतदान हा केवळ अधिकार नाही, तर जबाबदारी देखील आहे,” असे रोशनी भावसार हिने सांगितले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *