नवमतदारांनी पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावल्याने चेहऱ्यावरील आनंद गगणात मावेना

अमळनेर (प्रतिनिधी) पहिल्यांदाच मतदान करणार असल्याने दडपणसह, उत्सुकता नवमतदारांमध्ये होती. मात्र मतदान केल्यावर त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद गगणात मावत नव्हता. देशहीत आणि जनतेच्या उज्जवल भविष्यासाठी राष्ट्रीय कर्तव्य बजावणे किती महत्वाचे आहे. अशी भावना त्यांनी व्यक्त केली. स्वतः मतदान करुन इतरांनी मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य बजावावे, असे आवाहन त्यांनी नवमतदारांनी केले.

अमळनेर विधानसभा मतदारसंघासाठी बुधवारी मतदान झाले. यावेळी मतदानाचा पहिल्यांदाच हक्क बजावताना नव मतदारांमध्ये उत्सुकता पहावयास मिळाली. आपल्या सोयीच्या वेळेनुसार या नवमतदारांनी मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांनी मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य लोकशाहीत किती महत्वाचे आहे. संविधानाने दिलेला मताधिकार प्रत्येकांनी बजावावा, अशा भावना व्यक्त केल्या. मतदानासाठी लागलेल्या रांगा, मतदार यादीतील आपला नंबर आणि प्रत्यक्षात करावयाचे मतदान याचा अनुभव घेतला. त्यांच्यात उत्साह होता.

 

एक प्रकारे दडपण, पण आनंद वाटला

 

पहिल्यांदाच मतदान करावयाचे असल्याने  एक प्रकारे दडपण होते. निवडणूक  प्रशासनातर्फे मतचिठ्ठी (पोलचीट)  दोन दिवस अगोदर घरपोच मिळाल्यामुळे मतदान प्रक्रियेचा प्रत्यक्ष अनुभव घेऊन पहिल्यांदा मतदानाचा हक्क बजावता आला.

 

साक्षी हितेश शहा, नवमतदार, अमळनेर

 

मतदान केल्याचा मनस्वी आनंद

 

राष्ट्रीय कर्तव्य पहिल्यांदा पार पाडता आले,याचा मनस्वी आनंद आहे. लोकशाहीत मतदानाचा अधिकार बजावणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. देशहितासाठी मतदान महत्त्वाचे आहे.

 

रोहित रामचंद्र शिंदे, नवमतदार अमळनेर

 

राष्ट्रीय कर्तव्य पार पडल्याचा आनंद

 

प्रत्येक मतदानाच्या वेळी घरातील सर्व सदस्य मतदान करत यावेळी मी पहिल्यांदा मतदान करणार असल्याने उत्सुकता होती. देशाच्या हितासाठी व उज्वल भविष्यासाठी राष्ट्रीय कर्तव्य पार पाडता आले याचा मनस्वी आनंद आहे.

 

स्नेहा त्रिभुवन पटेल, नवमतदार, अमळनेर

 

माझ्यासाठी हा अनुभव खास

 

पहिल्यांदाच मतदान करणार असल्याने दडपण आणि उत्सुकता होती.घरातील व परिसरातील इतर मतदारांचा उत्साह पाहून मतदान केले. माझ्यासाठी हा अनुभव खास राहिला. प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजावणे किती महत्त्वाचे आहे. याची आपल्याला जाणीव झाली.

 

जैद नवाजोद्दिन शेख, नवमतदार, अमळनेर 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *