गजरे परिवाराने लग्नात आहेर म्हणून भेट दिली भारतीय संविधानाची प्रत

अमळनेर (प्रतिनिधी) येथील ताडेपुरातील गजरे परिवाराने मुलाच्या लग्नात इतर आहेर व्यतिरिक्त लग्नात आलेल्या मंडळींना भारतीय संविधानाची प्रत भेट देऊन एक नवीन संदेश दिला आहे. या उपक्रमाचे कौतुक केले जात आहे.

अमळनेर शहरातील ताडेपुरा भागात चि.हेमंत व चिसौका साक्षी यांचा विवाह नुकताच थाटामाटात झाला.  या विवाहात आपण आपल्या मुलाच्या लग्नात काही तरी नवीन संदेश जगाला द्यावा ह्या हेतूने मुलाचे वडील गोपाल समरथ गजरे यांनी संविधान प्रत वाटपाचा निर्णय घेतला व त्या पद्धतीने वाटपही केले आहे. यावेळी संविधान प्रत, इतर महापुरुषांची पुस्तके देखील वाटप करण्यात आली आहेत. गोपाल गजरे व त्यांच्या परिवाराने रबावलेल्या उपक्रमाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *