अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर विधानसभा मतदार संघात विप्रो कंपनी मार्फत आणि आधार संस्थेच्या सहयोगाने सीएसआर फंडातून इलेक्ट्रिक चार्जिंग बल्ब देऊन सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.
अमळनेर विधानसभा मतदार संघात निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार दिनांक 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. अमळनेर निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांत अधिकारी नितीन मुंडावरे , तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांनी विप्रो कंपनी व आधार संस्था च्या अधिकाऱ्यांना सीएसआर फंडा अंतर्गत मतदान केंद्र सुशोभीकरण करण्यासाठी आवाहन केले होते. त्यानुसार आज विप्रो कंपनी आणि आधार संस्थेमार्फत अमळनेर तालुक्यातील साडेतीनशे मतदान केंद्रांवर चार्जिंग चे इलेक्ट्रिक बल्ब , प्रकाश दिवे पुरवठा करण्यात आला.
दिनांक 18 रोजी दुपारी साडेतीन वाजता अमळनेर तहसील कार्यालयामध्ये विप्रो केअर कंपनीचे अधिकारी व आधार संस्थेचे प्रतिनिधी यांच्यामार्फत निवडणूक निर्णय अधिकारी नितीन मुंडावरे, तहसीलदार रुपेश कुमार सुराणा यांच्या उपस्थितीत इलेक्ट्रिक चार्जिंग बल्ब मतदान केंद्रावर पुरेशा प्रकाश रहावा उद्देशाने बल्ब सुपूर्द करण्यात आले व लोकशाहीच्या सगळ्यात मोठ्या उत्साहात सहभाग घेण्याचे ठरवले. याप्रसंगी विप्रो कंपनीचे प्लांट प्रमुख विजय बागजिलेवाले, सीनियर मॅनेजर मिलिंद मार्कंडे, फायनान्स मॅनेजर आनंद निकम, एचआर मॅनेजर चेतन थोरात आणि आधार संस्थेचे अश्विनी भदाने, दीपक संदानशिव, मुरलीधर बिरारी, योगिता पाटील, उर्जीता सिसोदे उपस्थित होते.