प्रशासनासह आजी, माजी लोकप्रतिनिधी यांचे आवाहन
अमळनेर (प्रतिनिधी) लोकशाही मजबूत आणि अमळनेर मतदारसंघाचे भविष्य उज्वल करण्यासाठी आज प्रत्येकाने आपला मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन प्रशासनासह आजी, माजी लोकप्रतिनिधी यांनी केले आहे.
गेल्या महिन्याभरापासून अमळनेर मतदार संघात प्रचाराचा धुराळा उडाला. त्यानंतर आज प्रत्यक्ष मतदान करण्याची वेळ आली आहे. लोकशाही मजबूत करण्यासाठी मतदानाचा टक्का वाढीसाठी प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणावर जनजागृती ही करण्यात आली आहे.
प्रत्येकाने मतदान करणे हा हक्क बरोबर कर्तव्य ही आहे. त्यामुळे जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करावे म्हणून प्रशासनासह लोकप्रतिनिधी यांच्याकडूनही मोठ्या प्रमाणावर आवाहन करण्यात आले आहे.