
अमळनेर(प्रतिनिधी) चोपडा ते चुंचाळे रस्त्यावर रात्री सव्वा आकराच्या सुमारास वाहनावर दगडफेक करून 65 हजार रुपयाचे दागिने व मोबाईल चोरी व मारहाण प्रकरणी अमळनेर न्यायालयाने 6 आरोपींपैकी एकास पाच वर्षांची शिक्षा सुनावली आहे तर पुराव्या अभावी एकाची निर्दोष मुक्तता केली आहे
सविस्तर असे की, चोपडा चुंचाळे रस्तावरील नवल नाल्याजवळ दि 25 ऑगस्ट 2017 रोजी रात्री सव्वा अकरा वाजेच्या सुमारास आरोपी ठाणसिंग बुधा भिलाला रा मोहाली ता सेंधवा,राकेश उर्फ डुचक्या चंद्रकांत तडवी रा जुडामोहाडा,रमेश रुपसिंग भिल,भाईला तेरसिंग भिल,भाईदास चंद्रसिंग तडवी,भाईदास बाजऱ्या बारेला यांनी मिळून फिर्यादी गुरुदास भगवान पाटील रा चुंचाळे ता चोपडा यांच्या कुझर गाडीवर दगड फेक करून 65 हजार रुपयाचे दागिने व मोबाईल जबरीने काडून घेऊन फिर्यादिस मारहाण करून जखमी केले होते याबाबत चोपडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता या घटनेचा तपास तत्कालीन पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील यांनी करून घटनेतील 2 आरोपीना अटक केली होती तर इतर चार फरार आहेत त्यापैकी राकेश उर्फ डुचक्या चंद्रकांत तडवी यास जिल्हा न्यायाधीश 2 व्ही पी आव्हाड यांनी पाच वर्षे शिक्षा व तीन हजार रुपये दंड,दंड न भरल्यास 6 महिने साधी कैद व दुसऱ्या कलमाखाली 1 वर्ष कैद व एक हजार रुपये दंड,दंड न भरल्यास एक महिना साधी कैदेची शिक्षा सुनावली तर दुसरा आरोपी ठाणसिंह बुधा भिलाला याला ठोस पुराव्याअभावी कोर्टाने निर्दोष मुक्तता केली सदर खटल्यात एकूण 14 साक्षीदार तपासण्यात आले सरकारी वकील ऍड शशिकांत आर पाटील यांनी युक्तिवाद केला.