‘हॅलो मी उमेदवार बोलतोय….’ या रेकॉर्डेड कॉलने अमळनेरचे मतदार आता वैतागले

मतदारसंघा बाहेरील उमेदवारांचा कॉल-द्वारे अमळनेरात प्रचाराच्या सपाट्याने नागरिक हैराण

 

अमळनेर (प्रतिनिधी) निवडणुकीच्या अनुषंगाने मतदारांच्या भेटीगाठी घेण्यावर उमेदवारांनी चांगलाच भर दिला होता.  मात्र आता मतदार संघासह बाहेरील मतदार संघातील उमेदवार रेकॉर्डेड कॉल करून ‘हॅलो मी उमेदवार बोलतोय’, मलाच मतदान करा’ असे कॉल येऊन मतदारांची रात्री अपरात्री चांगलीच झोप उडवली जात आहे. अमळनेर तालुक्यातील मतदार या कॉलच्या रेकॉर्डिंगला चांगलेच वैतागलेले आहेत.

अमळनेर मतदार संघातील प्रमुख राजकीय पक्षाच्या उमेदवारांनी रॅलीच्या माध्यमातून मतदारांची भेट घेण्यावर चांगला जोरात प्रचार केलेला असताना यासाठी पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांच्या गर्दीने शक्ती प्रदर्शन देखील केले गेले. तसेच विविध चौकांमध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून उमेदवारांच्या रॅलीचे स्वागत देखील करण्यात आले. असले तरी मोबाईल काही प्रचारकाच्या हातातून निसटलेला नाही. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदानाला एक दिवस शिल्लक असल्यामुळे अपक्षांसह महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी मोबाईलच्या माध्यमातून प्रचाराचा धडाका लावला आहे. मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी विविध पर्यायांचा अवलंब केला जात आहे त्यापैकी कॉल सेंटर मधून मतदारांना फोन करण्याच्या पर्यायाला शहरी व ग्रामीण भागातील उमेदवारांकडून पसंती दिली जात आहे. असे असले तरी उमेदवारांच्या प्रचारासाठी कॉल सेंटरमध्ये येणाऱ्या या फोनमुळे अमळनेर मतदार संघातील सर्व मतदार मात्र चांगलेच त्रासले आहेत. कारण, मतदारांच्या फोनवर मतदार संघाबाहेरील  उमेदवारांच्या प्रचाराचे देखील फोन येत आहेत. अशा प्रभावी प्रचारासाठी कॉल सेंटरची मदत घेतली आहे. कॉल सेंटरवरून मतदारांना रेकॉर्डिंग केलेले फोन येत आहेत. इथपर्यंत ठिक असले, तरी मतदार संघाबाहेरील  उमेदवारांच्या कॉल सेंटरवरून मतदारांना फोन येत आहे. त्यामुळे मतदाराना फोन कॉल आता सोसत नसल्याचे दिसत आहे.

 

वेगवेगळ्य क्रमांकावरून येतात फोन

 

एखादा नागरिक आपल्या कामांमध्ये गडबडीत असतो, अथवा गाडीवर असतो आणि अचानक फोन वाजतो. महत्त्वाचा कोणाचा असेल म्हणून तो फोन उचलल्यानंतर समोरून सर्वेच्या प्रश्नांचा भडिमार सुरू होतो. एकदा फोन कट केल्यानंतर परत दुसऱ्यांदा फोन केला जातो. वेगवेगळ्य क्रमांकावरून फोन येत असल्यामुळे ते टाळता येत नाहीत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *