मुडी मांडळ गटाने शिरीष चौधरींच्या पाठीमागे राहण्याचाच केला संकल्प

डॉ. दिपक पाटील,  डॉ. चेतन ठाकरे यांनी व्यक्त केला विश्वास

 

अमळनेर (प्रतिनिधी) विकासकामे अखंडितपणे सुरू राहावीत यासाठी अमळनेर मतदारसंघाचा शाश्वत विकासाचा चेहरा असलेल्या शिरीष चौधरी यांच्याशिवाय पर्याय नाही. असा विश्वास पंचायत समितीचे माजी सभापती डॉ. दिपक पाटील,  डॉ. चेतन ठाकरे यांनी सभेत व्यक्त केला आहे.

यावेळी व्यासपीठावर माजी आमदार शिरीष चौधरी, अमळनेर पंचायत समितीचे माजी सभापती डॉ.दिपक पाटील,  डॉ. चेतन ठाकरे, वावडे माजी सरपंच एन आर ठाकरे, माजी सरपंच मांडळ बाळासाहेब पवार, जितु बापू पाटील, रावसाहेब कोळी, माजी सरपंच मूडी प्र.डा. संजय युवराज पाटील, काशिनाथ माळी, नाना चौधरी, माजी सरपंच बोदर्डे संतोष चौधरी, सोनु संदानशिव, लोण चे माजी सरपंच किसन जिभाऊ पाटील, नाना पाटील,  संपूर्ण मुडी मांडळ गट. इ. उपस्थिती होते. डॉ. दिपक पाटील,  डॉ. चेतन ठाकरे म्हणाले, कोरोना काळा शिरीष दादा चौधरी यांनी निस्वार्थ केली जनतेची सेवा केली. शिरीष चौधरीनी २०१४ पासून राजकारणातून लोकसेवेचे व्रत हाती घेतलेले आहे. जातपात न करता त्यांनी सर्व समाजांना सोबत घेत आपली भूमिका म्हणजे जाणसामान्य भूमिका आहे. मतदारसंघवासीयांचे जीव वाचावेत म्हणून स्वत:चा जीव धोक्यात घालून कोरोना काळात त्यांनी केलेले कार्य अमळनेर तालुका कसे विसरेल ज्यांनी जातीचा वापर करून आमदारकी व मंत्री पद मिळवले त्यांच्या डोक्यात मंत्रीपदाची हवा गेली. त्यांनी जात, समाज आणि मतदारसंघाकडे पाठ फिरवत मंत्रीपदासाठी माती खाल्ली. हा मुडी मांडळ गट यांना नक्कीच त्याची जागा दाखवल्या शिवाय शांत राहणार नाही.

 

शेतकरी हवालदिल ः शिरीष चौधरी

 

पीक विमा, दुष्काळी निधीसाठी शेतकरी हवालदिल आहेत.  विद्यार्थी, सुशिक्षित बेरोजगार वाऱ्यावर आहेत. महिलांसाठी असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले  आहे. गेल्या पाच वर्षाच्या कालावधीत छेडखानीच्या प्रकारासंह गुंडगिरीने कळस गाठला आहे.  प्रशासनावर आणि पोलिस यंत्रणेवर नियंत्रण राहिलेले नसून कमिशन आणी टक्केवारी साठी हा उठा ठेव सुरू आहे. माझ्या पाच वर्षांच्या आमदारकीच्या कार्यकाळात महिला सुरक्षिततेचे व भयमुक्त वातावरण होते. आमदारच होतो पण दरारा आणि कामे मंत्र्यापेक्षा जास्त केलीत. शेतकरी, कष्टकरी, महिला, तरुण, यांच्यासाठी पोषक वातावरण होते. माझ्या कडे काम घेऊन आलेल्या कोणाचीच भावना निराश होत नव्हती. प्रत्येकाची समस्या समजून घेत ती सोडवण्यासाठी आतोनात माझा प्रयत्न असतो.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *