अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर विधानसभा मतदारसंघात ११ मतदान केंद्राचे मॉडर्न मतदान केंद्र म्हणून निवड केली आहे. लोकसभेच्या निवडणुकीत आधार संस्था आणि विप्रोने तीन मतदान केंद्र सुशोभीकरण कार्य उत्कृष्टपणे पार पाडली होती. आताही त्यांनीच पुढाकर घेतला आहे.
निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार २० नोव्हेंबर रोजी विधानसभेसाठी मतदान होणार आहे. अमळनेर विधानसभा क्षेत्रातील या विधानसभा निवडणुकीत निवडणूक निर्णय अधिकारी अमळनेर यांनी ११ मतदान केंद्राची मॉडेल मतदान केंद्र निश्चिती केली आहे. या विधानसभा निवडणुकीत पाच मतदान केंद्र ज्यात तीन महिला, एक युवक व दिव्यांग मतदान केंद्र सुशोभीकरण कार्यात सहभागी होण्यासाठी आधार व विप्रोकडे उपविभागीय अधिकारी, व तहसीलदार अमळनेर यांनी सोपवली आहे व आधार आणि विप्रो द्वारे सहभाग घेतला जाणार आहे. यशस्वितेसाठी आधार संस्थेचे टीम मेंबर ,अश्विनी सूर्यवंशी, दीपक संदानशिव हे समन्वयक म्हणून कार्य करीत आहेत.