अमळनेर (प्रतिनिधी) शहरातील शाळांतर्फे मतदार जनजागृती रॅली काढण्यात आली. यात नागरिकांना जास्तीत जास्त मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले. यात सानेगुरूजी विद्यामंदीर जी. एस. हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी हा उपक्रम राबवला.
साने गुरुजी विद्यालयातर्फे सोमवारी मतदान जनजागृतीसाठी शहरातून रॅली काढण्यात आली. यावेळी मुख्याध्यापक संजीव पाटील यांनी विद्यार्थ्यांनी मतदान जनजागृतीकशी करावी, आपले पालक आणि शेजाऱ्यांना मतदानासाठी कसे प्रवृत्त करावे याबाबत मार्गदर्शन केले. त्यानंतर गणेश कॉलनी, पटवारी कॉलनी, मराठा मंगल कार्यालय ते साने गुरुजी अशी विद्यार्थ्यांची रॅली काढली, त्यात विद्यार्थ्यांनी मतदान जनजागृती च्या घोषणा दिल्या यात शिक्षक शिक्षिका सहभागी झाले होते.
जी.एस.हायस्कूल
अमळनेर येथील खा.शि.मंडळ संचलित जी.एस.हायस्कूलतर्फेमतदान जनजागृती रॅली चे आयोजन करण्यात आले. अमळनेर विधानसभा मतदारसंघात स्वीप उपक्रमअंतर्गत मतदारांमध्ये जनजागृती व्हावी तसेच मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी या रॅलीचे आयोजन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी मतदान व मतदारांसाठी असलेले घोषणाफलक हातात घेऊन रॅली काढली. यावेळी मुख्याध्यापक बी.एस. पाटील, उपमुख्याध्यापक ए. डी. भदाणे, पर्यवेक्षक एस.आर. शिंगाणे, सी. एस. सोनजे, शिक्षक प्रतिनिधी एस.पी.वाघ तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.