अल्पवयीन तरुणीस लग्नाचे आमिष दाखवणे पडले महागात एका तरुणास न्यायालयाने ठोठावली शिक्षा

अमळनेर (प्रतिनिधी) चोपडा तालुक्यातील अडावद येथे लग्नाचे आमिष दाखवून एका 16 वर्षीय अल्पवयीन तरुणीस पळवून नेल्याप्रकरणी एका तरुणास अमळनेर सत्र न्यायालयाने एका वर्षांची शिक्षा सुनावली आहे
अडावद ता चोपडा येथील राजू आत्माराम कोळी वय 21 रा अडावद इंदिरा नगर याने एकाच गल्लीत राहणाऱ्या एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीस लग्नाचे अमिष दाखवून दि 28 जानेवारी 2017 ते 30 तारखेपर्यंत घरातून फूस लावून पळवून नेल्याची घटना घडली होती याबाबत पीडिताच्या वडिलांनी अडावद पोलिसात फिर्याद देवून याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेचा तपास एपीआय जयपाल हिरे यांनी केला होता
सदर खटल्यात एकूण 8 साक्षीदार तपासण्यात आले त्यात पीडित मुलीचा भाऊ हा प्रत्यक्ष दर्शी साक्षीदार असल्याने त्याची साक्ष महत्वाची ठरत जिल्हा सत्र न्यायधीश राजीव पी पांडे यांनी आरोपीस बाल लैंगिक अत्याचार कायद्याअंतर्गत 1 वर्ष साधी कैद, एक हजार रुपये दंड,दंड न भरल्यास 1 महिना साधी कैद व भादवी कलम 363 नुसार 1 वर्ष साधी कैद व 1 हजार रुपये दंड,दंड न भरल्यास एक महिना साधी कैद अशी शिक्षा सुनावली सदर खटल्याचे कामकाज सरकारी वकील किशोर आर बागुल यांनी पाहिले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *