डॉ. अनिल शिंदे यांच्या प्रचारार्थ झालेल्या सभेत सुप्रसिद्ध अभिनेते किरण माने यांचा हल्लाबोल
अमळनेर (प्रतिनिधी) महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अनिल शिंदे यांच्या प्रचारार्थ झालेल्या सभेत सुप्रसिद्ध अभिनेते किरण माने यांनी“एकीकडे बदमाश आहेत तर दुसरीकडे बाणेदार!” या वाक्याने सभेची सुरुवात करताच जोरदार टाळ्या टाळ्यांचा कडकडात झाला. आणि त्यांनी सभा जिंकली…
अमळनेर शहरातील सानेगुरुजी हायस्कूलच्या पटांगणात झालेल्या जाहीर सभेत सुप्रसिद्ध अभिनेते किरण माने यांची उपस्थितीत एक स्पष्ट संदेश दिला, “एकीकडे बदमाश आहेत तर दुसरीकडे बाणेदार!” या वाक्याने सभेची सुरुवात झाली. किरण माने यांनी आपल्या भाषणात सांगितले की, भाजपने ईडी, सीबीआयच्या नावावर राज्यात पक्षांना फोडले आहे, आणि हे एक कटकारस्थान आहे. दीड वर्षांतील महागाई, बलात्कार, आणि भ्रष्टाचाराच्या वाढती घटनांमुळे जनता संतापली आहे, त्यांनी भाजपावर हल्ला केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा संदर्भ देताना, यावेळी असं लक्षात आलं की जाती व धर्मासाठी भांडण लावायची धोरणे आज पुन्हा पुनरावृत्ती होण्यात आली आहे. “आपण स्वतंत्रतेसाठी लढले पाहिजे,” अशा महायुतीचा खरा चेहरा लोकासमोर आणा असे सांगितले.
विद्यमान सरकारवर घणाघात मंचावर उपस्थित असलेल्या पार्टीच्या इतर नेत्यांनीही वक्तव्ये केली. डॉ बी एस पाटील,प्रा. अशोक पवार, ॲड. ललिता पाटील, संदीप घोरपडे, प्रा. सुभाष पाटील, धनगर दला पाटील, जुगल प्रजापतीसह अनेकांनी आपल्या विचारांनी सभा दणाणून टाकली.व विरोधी उमेदवार यांचा बुरखा फाडला. खास करून, “डॉ. अनिल शिंदे हे उच्च शिक्षीत व विश्वास ठेवल्यासारखे उमेदवार आहेत,” असे विचार व्यक्त केले. प्रा अशोक पवार, ॲड. ललिता पाटील, धनगर दला, निळकंठ पाटील यांच्यासोबतच, गोवींदराव पाटील यांनीही विद्यमान सरकारच्या धोरणांवर सवाल केला. यावेळी तिलोत्तमा पाटील,मुन्ना शर्मा, मनोज पाटील,रिटा बाविस्कर, सचिन पाटील, श्याम पाटील, ऍड रज्जाक शेख,उमेश पाटील, विजय पाटील, श्रीकांत पाटील, चंद्रशेखर भावसार, यासंह असंख्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.