कोरोना काळात अनिल दादांनी हजारो रुग्णांना प्राणवायू देऊन दिले जीवनदान : पुष्पा पाटील

सर्व लाडक्या बहिणी लाडका भाऊ अनिलदादा सोबतच उभ्या

 

….नाही तर सूतगिरणीत 18 ऐवजी 90 कोटी केले असते लंपास.!

 

अमळनेर (प्रतिनिधी) भूमिपुत्र नामदार अनिल दादा पाटील यांनी कोरोना काळात ऑक्सिजन तथा प्राणवायुची पुरेशी व्यवस्था केल्याने आमच्या बहिणींचे पती, मुले,  आईवडील किंवा नातेवाईक असतील हे सारे वाचल्याने माझ्या सर्व लाडक्या बहिणी त्यांच्याच सोबत असल्याचा दावा बाजार समितीच्या संचालिका पुष्पा विजय पाटील यांनी केला आहे.

जे माजी आमदार याठिकाणी कोरोना काळात सेवा दिल्याचा दावा करीत आहेत, त्यांनी कोरोना रुग्णांच्या जीवाशी खेळ करणारे कोणतीही परवानगी नसलेले म्हणजेच बनावट कम्पनीचे रॅमिडिसिव्हर इंजेक्शन आणून त्याची चक्क जादा भावाने विक्री करत पैसा कमविला आहे. यामुळे त्या रॅमिडिसिव्हरचे साईड इफेक्ट्स आजही असंख्य भूमिपुत्रांना भोगावे लागत आहे. सुर्देवाने त्यावेळी ही बाब काही जाणकार व्यक्तींनी भूमीपुत्र अनिल दादांच्या निदर्शनास आणून दिल्याने त्यांनी आवाज उठविल्यानंतर सदर इंजेक्शन कंपनीवर शासनाची रेड पडून कारवाई झाली आणि अमळनेरात त्याचा पुरवठा बंद झाला होता. जर त्यावेळी अनिल दादांनी आवाज उठविला नसता तर मोठे विपरीत घडले असते असे तज्ज्ञ डॉक्टरांचे मत आहे. विशेष म्हणजे अनिल दादांनी मात्र कोणताही गाजावाजा न करता हजारो रुग्णांना दर्जेदार कंपनीचे इंजेक्शन उपलब्ध करून दिल्याने अनेकांचे प्राण वाचले आहेत. ही लोक मात्र अशा संकटाच्या काळात देखील हे लोक पैसाच कमवित असतील तर यांना लोकप्रतिनिधी म्हणविण्याचा कोणताही अधिकार नाही. कोरोनाच्या काळात आम्ही येथे खूप सेवा दिली असा दावा करणाऱ्यांनी दोन्ही लाटेत अमळनेर येथे आपण फक्त दोनच वेळा आलात हे आम्ही अमळनेरकर विसरलेलो नाहीत हे लक्षात घ्यावे. जिल्ह्यात कोरोना रुग्ण आढळू लागताच अनिल दादांनी सानेगुरुजी शाळेत शहरातील सर्व तज्ञ डॉक्टरांच्या सहयोगाने मोठा कॅम्प घेतला. त्यानंतर रुग्ण वाढू लागताच आमदार निधीतून औषधी व सॅनिटायझर किट घेण्यासाठी ग्रामिण रुग्णालयास 15 लक्ष आणि नगरपालिका दवाखान्यास 15 लक्ष व पुन्हा तपासणीसाठी अँटीजन किटसाठी 10 लक्ष रुपये दिलेत. ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजनचा पुरवठा वाढविला. रुग्ण संख्या प्रचंड वाढल्यावर इंदिरा भुवन येथे 70 रुग्णांना ऑक्सिजन बेड ची व्यवस्था केली यामुळे रुग्णांना दिलासा मिळाला.कमी लक्षणे असणाऱ्या रुग्णांसाठी प्रताप महाविद्यालयाच्या वसतिगृहात विलगीकरणं कक्षाची निर्मिती केली.सरकारी रुग्णालयात डॉक्टर कमी पडू लागल्यावर खाजगी डॉक्टरांकडून सेवा करून घेतली,अनिल दादा स्वतः जीवाची पर्वा न करता सर्वत्र जनतेसाठी फिरून एक दोन दिवसाआड अधिकारी असतील किंवा डॉक्टर असतील यांच्या बरोबर बैठका घेत होते. सॅनिटायजिंग व स्वच्छता यावर ही त्यांचे नियंत्रण होते,या भूमीतील अगदी पहिला रुग्ण आढळल्यापासून शेवटचा रुग्ण 100 टक्के बरा होईस्तोवर अनिलंदादाना खुलेआम सेवा देताना मतदारसंघातील संपूर्ण जनतेने पाहिले असून कोरोना लस उपलब्ध करण्यासाठी साठी देखील अनिल दादांनी यशस्वी प्रयत्न केल्याने याठिकाणी लसीकरण वेगाने झाले आहे.या केलेल्या कार्यासाठी त्यांना कोणत्या पुराव्याची गरज नाही. याची साक्षीदार जनताच असल्याने अनेक कुटुंबाच्या दुवा त्यांच्यासोबत नक्कीच असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

 

कार्यकर्त्यांचे मोठे वैभव

 

तसेच कार्यकर्ता कसा जोपासावा हे अनिल दादांना सांगण्याची गरज नसून त्यामुळेच आज कार्यकर्त्यांचे मोठे वैभव असलेले ते जिल्ह्यातील एकमेव नेते आहेत.आणि कार्यकर्त्यांना त्यांनी मोठेही केले आहे. तसेच तुमच्या म्हणण्यानुसार बरं झालं त्यांनी सूतगिरणीला 90 कोटी मिळण्याला ब्रेक मारला अन्यथा 18 ऐवजी 90 कोटी लंपास झाले असते असा टोला लगावत आमच्या सर्व लाडक्या बहिणी विकास पुरुष असलेल्या अनिल दादा पाटील यांना बहुमताने विजयी करतील असा दावा केला आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *