त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त मंगळग्रह मंदिरात रंगला तुलसी विवाह

अमळनेर (प्रतिनिधी) त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त  १५ रोजी श्री मंगळग्रह मंदिरात हजारो भाविकांच्या साक्षीने श्री तुलसी विवाह महासोहळा विधिवतरीत्या व अत्यंत जल्लोषात साजरा झाला.

प्रारंभी वर राजा भगवान श्रीविष्णू व वधुराणी माता श्री तुलसी यांच्या प्रतिकात्मक मूर्ती विराजमान असलेला रथ तसेच श्री मंगळदेव ग्रहाची उत्सवमूर्ती असलेल्या पालखीची मंदिर परिसरात वाजत – गाजत  मिरवणूक काढण्यात आली. याप्रसंगी हजारो भाविकांनी जल्लोषपूर्ण नृत्यासह मंत्रघोष करीत आनंद व्यक्त केला.  या महासोहळ्याचे डॉ. राकेश शर्मा (अमळनेर),  प्रमोद पाटील (जळगाव), गौरव देवरे (भोकर, जि. धुळे), अंबादास देवरे (जळगाव), डॉ. आनंद जोशी (धुळे), अनिल ठाकूर (अमळनेर), डॉ. भूपेंद्र महाले (अमळनेर), डॉ. राजेश विश्वासराव पाटील (जळगाव), कुमार कडलक (नाशिक), प्रा. पराग पाटील (अमळनेर), अशोक ब्रम्हेचा (अमळनेर) हे सपत्नीक पुजेचे मानकरी होते.  मंगलाष्टके होऊन विधिवत रित्या विवाहसोहळा पार पडला. याप्रसंगी सप्तरंगाची आतषबाजी करण्यात आली. स्वाती चौधरी यांनी वधू राणी श्री तुलसीदेवी यांच्या मूर्तीवर आकर्षक साजशृंगार केला.

    वर-वधूच्या मामांची भूमिका महेश कोठावदे व रवींद्र बोरसे यांनी निभावली.    या महासोहळ्याप्रसंगी मेघा बारी, खुशी पाटील, नंदिनी पाटील, चैताली पाटील यांनी पुष्पवृष्टी व अक्षता वाटप केले.

विवाह महासोहळ्यानंतर सुमारे हजारो भाविकांनी पारंपारिक अस्सल महाराष्ट्रीयन विशेष महाप्रसादाचा आस्वाद घेतला. विशेष म्हणजे पुणे येथील ख्यातनाम वेंकीज कंपनीतर्फे गावरान तुपातील बालूशाहीचे सोमवार व मंगळवारी प्रसाद स्वरूप वाटप केले.मंदिराचे मुख्य पुरोहित प्रसाद भंडारी यांनी पौरोहित्य केले. त्यांना तुषार दीक्षित, जयेंद्र वैद्य, गणेश जोशी, शुभम वैष्णव, मंदार कुलकर्णी, वैभव लोकाक्षी यांनी सहकार्य केले. याप्रसंगी केशव पुराणिक, सारंग पाठक, नरेंद्र उपासनी, अथर्व कुलकर्णी, व्यंकटेश कळवे आदी दिग्गज पुरोहितही उपस्थित होते.  मंगळग्रह सेवा संस्थेतफे उपस्थितांना मतदान जनजागृतीपर शपथही अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले यांनी या प्रसंगी दिली. या वेळी शहरातील विविध समाज मंडळांचे अध्यक्ष  व पदाधिकारी, महिला मंडळाच्या अध्यक्षा व पदाधिकारी, व्हॉईस ऑफ मीडियाचे पदाधिकारी तसेच  पंचक्रोशीतील असंख्य भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले, उपाध्यक्ष एस. एन. पाटील, सचिव एस. बी. बाविस्कर, खजिनदार गिरीश कुलकर्णी, विश्वस्त अनिल अहिरराव, जयश्री साबे, प्रकाश मेखा, आशा महाले, आनंद महाले, स्वाती महाले, व्ही. व्ही. कुलकर्णी, डी. ए. सोनवणे, सेवेकरी उज्ज्वला शहा, विनोद कदम, विनोद अग्रवाल, जी. एस. चौधरी, उमाकांत हिरे, पुष्यंद ढाके, आर. टी. पाटील, विशाल शर्मा, ए. डी. भदाणे, दीपाली सोनवणे, आशिष चौधरी, सुबोध पाटील, निलेश महाजन, मनोहर पाटील, बाळा पवार, विशाल शर्मा, राहुल बहिरम, राजेंद्र वर्मा, आर. डी, पाटील, एम. जी. पाटील, जे. व्ही. बाविस्कर आदींनी परिश्रम घेतले. डॉ. डिगंबर महाले यांनी सूत्रसंचालन केले, तर आभार प्रकाश मेखा यांनी मानले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *