अमळनेर (प्रतिनिधी) पोलीस आणि आयटीबीटी पथकाने निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांच्या मनातून भीती दूर होण्यासाठी शक्ती प्रदर्शन करीत शहरातून संयुक्त रूट मार्च काढला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून रूट मार्चला सुरुवात झाली. अमळनेर पोलिस स्टेशनचे निरीक्षक विकास देवरे आणि इंडो तिबेट बॉर्डर पोलीसचे निरीक्षक हयातसिंग यांच्या नेतृत्वाखाली शस्रधारी पोलिसांसह रूट मार्च पाच कंदील, दगडी दरवाजा, सराफ बाजर, पान खिडकी, वाडी चौक, कसाली डीपी, भोई वाडा, माळीवाडा, गैबान शहा बाबा दर्गा, झामी चौक, पवन चौक, तिरंगा चौक, भाजी मार्केट परिसर, सुभाष चौक मार्गे पार्ट गांधली पुरा चौकी येथे समाप्त झाला. रूट मार्च मध्ये सपोनि रवींद्र पिंगळे, सपोनि जगदीश गावित, सपोनि जीभाऊ पाटील, पोलिस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ, उपनिरीक्षक नामदेव बोरकर, उपनिरीक्षक युवराज बागुल यांच्यासह सिद्धांत शिसोदे, गणेश पाटील, अमोल पाटील, मिलिंद बोरसे, जितेंद्र निकुंभे यांच्यासह २४ अमलदार, इंडोतिबेटचे ३ अधिकारी ४० अंमलदार, १०५ होमगार्ड सहभागी झाले होते.