महाविकास आघाडीचा जाहीरनामा म्हणजे सबका साथ सबका विकास

सर्वसामान्य जनता आपल्या पाठीशी :  काँग्रेसचे उमेदवार डॉ अनिल शिंदे

 

अमळनेर (प्रतिनिधी) महाविकास आघाडीचा जाहीरनामा म्हणजे सबका साथ सबका विकास आसल्याने महाराष्ट्रात महाविकास आघाडीला मतदारांचा कौल आहे. त्यामुळे मतदार आपल्यालाच कौल देणार आहे, असा दावा महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अनिल शिंदे यांनी केला आहे.

या जाहीरनाम्यात महिलांसाठी शक्ती कायद्याची अंमलबजावणी, राज्यभरात महिलांना बस प्रवास मोफत, मासिक पाळीत महिलांना दोन दिवस सुट्टी, महालक्ष्मी योजनेअंतर्गत महिलांना महिन्याला ३००० रूपये देणार आहे. सुशिक्षित बेरोजगारांना महिन्याला ४००० रूपये भत्ता देणार, राज्य सरकारच्या अडीच लाख जागांची भरती करणार, एमपीएससीचे वेळापत्रक जाहीर करुन ४५ दिवसांत निकाल, संजय गांधी निराधार योजनेतून २००० रुपये, शिवभोजन थाळी केंद्रांची संख्या वाढवणार, सुक्ष्म व लघू उद्योगांसाठी स्वतंत्र मंत्रालय

६ गॅस सिलेंडर प्रत्येक ५०० रुपयांत देणार, ३०० युनिट वापरणाऱ्यांचे १०० युनिटचे बील माफ करणार, शेतकऱ्यांचे ३ लाखांपर्यंतचे कर्ज माफ करणार. सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना, सरकारी रुग्णालयात मोफत औषध उपलब्ध करणार, २५ लाखांची आरोग्य विमा योजना लागू करणार  त्यामुळे आता महायुती आणि महाविकास आघाडी या दोघांच्या जाहीरनाम्यातील कोणत्या गोष्टी मतदारांना भावणार आणि मतदार कोणाच्या पारड्यात आपले मत टाकणार हे येणाऱ्या २३ नोव्हेंबर रोजी निकालातून स्पष्ट होईल. सध्या तरी महाराष्ट्रामध्ये चर्चा आहे महाविकास आघाडीचा जाहीरनामा हा सर्वसामान्य लोकांच्या हिताचा आहे. म्हणून येणाऱ्या निवडणुकीमध्ये 20 नोव्हेंबरला महाविकास आघाडीलाच मतदार कौल देणार, असे अमळनेर विधानसभा निवडणुकीचे महाविकास आघाडीचे तथा काँग्रेसचे उमेदवार डॉ अनिल नथ्थू शिंदे यांनी सांगितले

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *