स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूलने पथनाट्यातून केली मतदार जनजागृती

अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर शहरातील स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल या शाळेतील विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर करून अमळनेर शहरातील मतदारांसाठी जनजागृती मोहीम राबवली. यास उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.

या मोहिमेअंतर्गत शाळेतील विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर करून नागरिकांसाठी मतदान करणे किती आवश्यक आहे, मतदान करणे हे नागरिकांचे कर्तव्य आहे, याबद्दल मतदारांना माहिती दिली. हे पथनाट्य अमळनेर शहरातील सुभाष चौक परिसरातील आंबेडकर चौक व तिरंगा चौक येथे सादर करण्यात आले. तसेच बस स्टँड परिसर, रेस्ट हाऊस चौक, मंगलमूर्ती चौक, कॉटन मार्केट व आठवडे बाजार येथे जाऊन सुद्धा सदर विद्यार्थी मतदाना जनजागृती करत आहेत. कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी व विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी अमळनेर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तुषार नेरकर सर उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांचे व शाळेने राबवलेल्या मोहिमेचे कौतुक केले. तसेच अमळनेर चे तहसीलदार रुपेश कुमार सुराणा यांनी सुद्धा या जनजागृती मोहिमेचे कौतुक करून विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले. शाळेतील विद्यार्थ्यांसह शाळेतील शिक्षक यांनी शाळेचे मुख्याध्यापक  विनोद अमृतकर व अध्यक्षा सितिका अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवला. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या या पथनाट्याचे अमळनेर शहरातील सर्व नागरिकांनी कौतुक केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *