अमळनेर (प्रतिनिधी) शहरातील सर्वच प्रभागात महायुतीचे उमेदवार मंत्री अनिल भाईदास पाटील यांचा प्रचार दौरा प्रचंड प्रतिसादामुळे एक नाव उचांक गाठत आहे. भूमिपुत्र व विकास पुरुष म्हणून संपुर्ण शहरात त्यांना प्रत्येक ठिकाणी पसंती मिळत असल्याची भावना माजी उपनगराध्यक्ष गोपी कासार व माजी नगरसेवक नरेंद्र चौधरी आणि भारतीय जनता पार्टी प्रदेश युवा मोर्चा सचिव भैरवीताई पाटील यांनी व्यक्त केली.
रॅली प्रसंगी आपल्या भावना व्यक्त करताना ते म्हणाले की, प्रत्येक प्रभागात महिला भगिनींची औक्षण करण्यासाठी रीघ लागत असून गल्लोगल्ली फटाक्यांच्या आतिषबाजीने स्वागत केले जात आहे.एकंदरीत सारे शहरच अनिल पाटील यांचे समर्थन करीत असल्याचे हे चित्र असून कदाचित संपूर्ण शहरातून रेकॉर्ड ब्रेक मतदान होईल आणि मोठे मताधिक्य त्यांना मिळेल असेच चित्र आज तरी दिसत आह. मंत्री अनिल पाटील यांनी शहर व ग्रामिण भागात केलेल्या उल्लेखनीय विकास कामांमुळे हा प्रतिसाद असून विशेष करून बाजार पेठेत झालेले सर्व रस्ते, गुंडगिरी कमी झाल्याने व्यापारी बांधवांचा संपलेला त्रास यामुळे व्यापारी व व्यावसायिक बांधव प्रचंड खुश आहेत. कोरोना काळात मंत्री अनिल पाटील यांनी जनतेची अहोरात्र केलेली सेवा लोक अजून विसरलेले नसून अनेक प्रभागात नागरिकांनी याबाबत भावना बोलून दाखविल्या आहेत.अनेक भागात झालेला विकास आणि मंजुर झालेली १९७ कोटींची दररोज पाणी देणारी योजना यामुळे महिला वर्गही खुश आहे. आपल्या मातीचा भूमिपुत्र म्हणूनच नव्हे तर हे भूमिपुत्र विकास पुत्र देखील असल्याने आणि त्यांना पुन्हा संधी दिल्यास मंत्री पद पुन्हा मिळुन शहराचा विकासाचा आलेख अजून वाढणार असल्याने आम्ही सर्व आजी माजी नगरसेवक एकसंघ झालो असून कोणत्याही परिस्थितीत शहरातून मताधिक्य देण्याचा निर्धार आम्ही केला आहे.