प्रताप महाविद्यालयाला विद्यापीठ अंतर्गत जुदो स्पर्धेमध्ये दुहेरी विजेतेपद

अमळनेर (प्रतिनिधी)  क. ब. चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अंतर्गत एरंडोल विभागद्वारा आयोजित आंतर महाविद्यालय जुदो स्पर्धेत प्रताप वरिष्ठ महाविद्यालयाच्या जुदो पुरुष व महिला दोन्ही संघाने दुहेरी   विजेतेपद मिळवले.

या स्पर्धाचे आयोजन प्रताप महाविद्यालयात करण्यात आले होते. यात एरंडोल विभागातील ६ पुरुष व ३ महिला संघ  सहभागी होते .या प्रसंगी सचिव व प्राचार्य डॉ. अरुण बी. जै,जिमखाना समन्वयक डॉ. संदीप नेरकर, प्रा. नितीन पाटील, डॉ. सुनील राजपूत, सचिव व निवड समिती प्रमुख प्रा. किशोर वाघ, डॉ.शैलेश पाटील, डॉ. हर्ष सरदार, प्रा. डॉ. दीपक पाटील, आयोजक क्रीडा संचालक डॉ. सचिन पाटील, प्रा.अमृत अग्रवाल, प्रा. अर्चना पाटील, प्रशांत देवकाते, मुख्य पंच यज्ञेश जगताप उपस्थित होते.

प्रतापच्या खेळाडूंच्या यशाबद्दल खा. शि. मंडळ अध्यक्ष जितेंद्र झाबक, उपाध्यक्ष माधुरी देशमुख, विश्वस्थ वसुंधरा लांडगे, कार्याध्यक्ष डॉ.संदेश गुजराथी, कार्योपाध्यक्ष्य निरज अग्रवाल, जेष्ठ संचालक हरी भीका वाणी, संचालक योगेश मुंदडा,डॉ. अनिल शिंदे, प्रदीप अग्रवाल,  सहसचिव डॉ. धीरज वैष्णव, उप प्राचार्य डॉ. कल्पना पाटील, प्रा. पराग पाटील, डॉ. अमित पाटील, डॉ. विजय मांटे,सी. सी. एम. सी प्रमुख डॉ. विजय तुंटे, डॉ. योगेश तोरवणे, जिमखाना समन्वयक  प्रा. डॉ. संदीप नेरकर ,आयक्यूएसी  प्रमुख डॉ. मुकेश भोळे, स्पर्धा आयोजक व क्रीडा संचालक प्रा. डॉ. सचिन पाटील, प्रा. अमृत अग्रवाल, रजिस्टरार राकेश निळे, प्रा.अर्चना पाटील,प्रशांत देवकाते व सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विदयार्थी, खेळाडू यांनी विजेत्यांचे कौतुक केले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *