अमळनेर (प्रतिनिधी) येथील जी. एस. हायस्कूल येथे मतदान जनजागृती अभियानांतर्गत चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. त्यासा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकशाही मजबूत करण्यासाठी मतदारांमध्ये मतदान जनजागृतीसाठी शिक्षण विभागातर्फे विविध उपक्रम राबवले जात आहेत. या अंतर्गत जी.एस.हायस्कूल येथे चित्रकला स्पर्धा झाली. या वेळी विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. यावेळी मुख्याध्यापक बी.एस.पाटील,उपमुख्याध्यापक ए. डी. भदाने, पर्यवेक्षक एस.आर. शिंगाने, सी. एस. सोनजे, कलाशिक्षक के. व्ही. पाठक तसेच शिक्षक व शिक्षतेकर कर्मचारी उपस्थित होते.