काँग्रेसचे उमेदवार डॉ. शिंदेच्या प्रचारार्थ नेते, कार्यकर्ते पिंजून काढताहेत तालुका

अमळनेर (प्रतिनिधी) एके काळी काँग्रेसचे प्राबल्य असलेल्या अमळनेर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अनिल शिंदे यांच्या उमेदवारीने तालुका काँग्रेसला पुन्हा नवसंजीवनी आली आहे. त्यांच्या विजयासाठी महाविकास आघाडीचे सर्वच नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते तालुका पिंजून काढत आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांचा विश्वास दुनावला आहे.

       अमळनेर तालुक्यात आधी काँग्रेसचे मोठे प्राबल्य होते. ॲड. ललिता पाटील ह्यांचा काँग्रेसच्या तिकिटावर निसटता पराभव झाला होता. त्यानंतर मात्र गटबाजीने काँग्रेसला उतरती कळा लागली होती. यंदाच्या निवडणुकीत मात्र अमळनेरची जागा काँग्रेसला सुटल्याने व डॉ. अनिल शिंदे यांच्यासारखा तुल्यबळ उमेदवार मिळाल्याने काँग्रेसला पुन्हा नवसंजीवनी मिळाली आहे. महाविकास आघाडीचे सर्वच नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते हे ग्रामीण भागात जाऊन डॉ. शिंदेचा प्रचार करत असून संपूर्ण तालुका पिंजून काढत आहेत. डॉ. अनिल शिंदे निवडून आल्यास तालुका काँग्रेसला पुन्हा जुने दिवस येतील असा विश्वास जुनेजाणते काँग्रेसचे कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *