मंत्री अनिल पाटलांना गौण खनिज उपसा करून शासनाचे कोट्यावधी रुपये बुडवले

डॉ. रवींद्र चौधरी यांनी केला आरोप

 

अमळनेर (प्रतिनिधी) शासनाने मनाई केलेल्या क्षेत्रात मंत्री अनिल पाटील यांनी सातत्याने अवैध गौण खनिज उपसा सुरू ठेवून शासनाचे कोट्यावधी रुपये बुडवले आहेत, असा आरोप डॉ. रवींद्र चौधरी यांनी केला आहे.

चौधरी यांनी म्हटले आहे की, गेल्या पाच वर्षात विकासाच्या मुद्द्यावर एकही हुं की चू न करणाऱ्या मंत्र्याला आता कसा विकासाचा पुळका आलाय. गेल्या पाच वर्षात शाश्वत विकासाच्या नावावर निव्वळ गप्पा करणारा, अन बॅनरवरचा विकास करणारा, मंत्री आता जनतेच्या दारा दारात फिरत आहे. हीच जनतेची खरी ताकद आहे. गेल्या पाच वर्षात विकासाच्या मुद्द्यावर कधीही न चर्चा करणारे मंत्री महोदय, जनतेसाठी पाच वर्षात एकही आम सभा न घेणारे मंत्री आता प्रत्येक समाजाचा पाठिंबा घेऊन जणू मी निवडणूक जिंकून आमदार होणार असे भासवात आहेत. परंतु अमळनेरची जनता सुज्ञ आहे. ती, खडी, माती, सिमेंट, खाणाऱ्या अन, अमळनेर तालुक्याला टक्केवारीत लुटणाऱ्याला त्यांची जागा दाखवणारच यात शंका नाही, असे शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख गुलाब पाटील यांनी बोलून दाखवले.

 

जिल्हाधिकाऱ्यांनी बजावली नोटीस

 

जळगांवचे जिल्हाधिकारी यांनी अनिल पाटील यांना नोटीस बजावली  आहे. यावर प्रकरणावर ते का बोलत नाहीत? शिरिषदादा चौधरी यांनी सूतगिरणी प्रकरणी जे सत्य आहे ते स्पष्ट मांडून खुलासा केला. मंत्री असून गौण खनिज उपसा केला व शासनाला फसवले असा आमदार जो शासनाचे नुकसान करतो आणि जनतेची दिशाभूल करतो त्या आमदाराचे पुनर्वसन अमळनेरची जनता करणार का?  असा सवाल डॉ. रविंद्र चौधरी यांनी विचारला आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *