खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ब्रेकिंग

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या नूतन जिल्हा व तालुका पदाधिकारी यांची नियुक्ती

अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर येथील चोपडा रस्त्यावरील दमोता माता स्टोन क्रशरवर आयोजित मेळाव्यात शिक्षक पदाधिकाऱ्यांची नियुक्ती आशिष दिलीपराव शिंदे (जळगांव जिल्हा उपाध्यक्ष),राहूल दिलीप पाटील (जळगांव जिल्हा प्रसिद्धी प्रमुख ) हर्षल माणिकराव पाटील (तालुकाध्यक्ष अमळनेर)श्री भुषण अशोक सोनवणे (अमळनेर तालुका कार्याध्यक्ष ) श्री.कैलास रामदास पाटील(शहर अध्यक्ष अमळनेर) यांची राष्ट्रवादी शिक्षक सेलची निवड करून नियुक्ती पत्र देण्यात आले.
या कार्यक्रमाप्रसंगी शिक्षक सेलचे जिल्हाध्यक्ष गजानन गव्हारे यांनी आपल्या मनोगतात शिक्षक बांधवांना जर काही समस्या असतील तर आमच्या जिल्हा तसेच तालुका कार्यकारिणी सदस्यांना सांगा आम्ही आपल्या समस्या निराकरण्यासाठी सदैव कटीबद्ध आहोत असे आश्वासन दिले. मेळाव्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते आदरणीय अरुणभाई गुजराथी, आ.डाॅ सतिश अण्णा पाटील, मा.मंत्री गुलाबराव देवकर, मा.आ.दिलिपभाऊ वाघ, मा.आ.राजीवदादा देशमुख, अल्पसंख्यांक सेलचे प्रदेशाध्यक्ष हाजी गफ्फारभाई मलिक, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रविंद्र भैय्या पाटील, अनिल भाईदास पाटील,जेष्ठ नेत्या सौ. तिलोत्तमा पाटील, निरीक्षक करणभैय्या खलाटे, ग्रंथालय सेलचे प्रदेशाध्यक्ष उमेश पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जि.प.गटनेते शशिकांत साळुंखे, कार्याध्यक्ष विलास पाटील, जिल्हा प्रवक्ता खलिल देशमुख, महिला जिल्हाध्यक्ष कल्पनाताई पाटील, युवक जिल्हाध्यक्ष ललित बागुल, तर मेळावा यशस्वीतेसाठी प्रदेश कार्यकारिणी सदस्य शिवाजीराव पाटील, विधानसभाक्षेत्र प्रमुख भागवत पाटील, तालुकाध्यक्ष सचिन बाळू पाटील, कार्याध्यक्ष सुरेश पाटील, एल.टी. पाटील, शहराध्यक्ष मुक्तार खाटीक,शहर कार्याध्यक्ष विनोद कदम,रणजित पाटील, युवक जिल्हाउपाध्यक्ष गौरव पाटील, युवक शहराध्यक्ष बाळू पाटील तुषार पाटील (संचालक सानेगुरुजी पतसंस्था)संजय पाटील (अध्यक्ष अमळनेर तालुका माध्यमिक शिक्षक संघ) एम ए पाटील (अध्यक्ष मुख्याध्यापक संघ अमळनेर) आर जे पाटील (जिल्हा कार्याध्यक्ष शिक्षक भारती)सुशिल भदाणे (अध्यक्ष अमळनेर तालुका टी डी एफ )जितेंद्र पाटील,संदीप पाटील आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button