मारवड महाविद्यालयात पुण्यतिथी निमित्ताने न्हानाभाऊ यांच्या कार्यास उजाळा

अमळनेर (प्रतिनिधी)  तालुक्यातीलमारवड येथील ग्राम विकास शिक्षण मंडळ संचलित कै. न्हानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील कला महाविद्यालयात न्हानाभाऊ यांच्या 32 व्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी त्यांच्या कार्यास उजाळा देण्यात आला.

महाविद्यालयात ज्येष्ठ संचालक महारु पाटील तसेच विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन शरद पाटील यांच्या हस्ते न्हानाभाऊ यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी गावातील अनेक पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.  ग्रामविकास शिक्षण मंडळाचे अध्यक्ष जयवंतराव मन्साराम पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष देविदास शामराव साळुंखे, संचालक  दिनेश वासुदेव साळुंखे व इतर मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले.  याप्रसंगी संस्थेचे संचालक वाय. के. पाटील, चंद्रकांत सिसोदे व संस्थेचे प्रशासकीय अधिकारी के. व्हि. पाटील आणि सु. हि. मुंदडा हायस्कूल व श्रीमती. द्रो. फ. साळुंखे कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य, पर्यवेक्षक, शिक्षक व शिक्षकेतर वृंद तसेच वि.या.पाटील हायस्कूल करणखेडाचे मुख्याध्यापक,शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी, न्यू इंग्लिश स्कूल डांगरी हायस्कूलचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. याप्रसंगी त्यांच्या कार्याविषयी माजी प्राचार्य हरिभाऊ मारवडकर तसेच  प्राचार्य. डॉ. वसंत देसले आणि उपप्राचार्य प्रा.विश्वनाथ पाटील यांनी त्यांच्या कार्याविषयी सविस्तर माहिती दिली. याप्रसंगी माजी प्राचार्य एल. जे. चौधरी, मधुकर कौतिक पाटील, शेखर साळुंखे, नरेंद्र शांताराम पाटील तसेच अनेक मान्यवर प्रतिष्ठित मंडळी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि प्रा.विश्वनाथ पाटील यांनी केले. कार्यक्रमास महाविद्यालयीन प्राचार्य प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *