महायुतीचा आज मंत्री अनिल पाटलांच्या प्रचारार्थ बुथ कार्यकर्ता मेळावा

अमळनेर (प्रतिनिधी) विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार अनिल भाईदास पाटील यांच्या प्रचारार्थ 11 रोजी भव्य बुथ कार्यकर्ता मेळावा होणार आहे. सायंकाळी 5 वाजता बन्सीलाल पॅलेस येथे  हा मेळावा होणार आहे.

यावेळी खासदार स्मिताताई उदय वाघ व मंत्री अनिल पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

महायुतीचे सर्व पदाधिकारी सर्व फ्रन्टलचे अध्यक्ष, माजी जि प व प स सदस्य,सर्व सरपंच, उपसरपंच, वि.का. सोसायटीचे चेअरमन व सदस्य बुथ कमेटी कार्यकर्ते आणि माजी नगरसेवक व बाजार समितीचे आजी माजी संचालक यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन महायुतीचे सर्व तालुकाध्यक्ष व शहराध्यक्ष अमळनेर विधानसभा क्षेत्र यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *