अमळनेर (प्रतिनिधी) मंत्री अनिल भाईदास पाटील यांच्या कार्यकर्तृत्वाने अमळनेर मतदार संघाचा प्रथमच खऱ्या अर्थाने विकासाला गती लाभल्याची भावना शहरातून व्यक्त होत आहे.
यासंदर्भात शहरातील व्यापारी लालचंद सैनानी, भरतकुमार ललवाणी,निलेश भांडारकर, भाईदास महाजन,माजी नगरसेवक नरेंद्र चौधरी, अजय केले, प्रितपाल सिंग बग्गा, बापू हिंदुजा, जितेंद्र भामरे, भाजप शहराध्यक्ष विजय राजपुत, कमल कोचर, दिनेश कोठारी, जूनैद शेख, विजयकुमार जैन, दत्ता कासार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले की महाराष्ट्रातील उज्वल पान म्हणून अमळनेरची ओळख निर्माण झाली असली तरी गेल्या काही वर्षांपासून येथे उणीव भासत होती ती विकास कामांच्या वैभवाची. मात्र २०१९ साली झालेली विधानसभेची निवडणूक या भूमीसाठी विकासाची नांदीच निर्माण करणारी ठरली. कारण भूमिपुत्राच्या रूपाने प्रचंड कार्यकुशल आणि अभ्यासू असं नेतृत्व अनिल दादाच्या रूपानं पुढे आल. अनिल दादाने या भूमीत विकासनिधीचा जणूकाही पाऊसच पाडला. कोट्यवधीच्या निधीने आणि त्यातून होणाऱ्या विकासाने येथील जनताही सुखावली. उत्तर महाराष्ट्रात कोणत्या शहराचा चेहरा मोहरा गेल्या पाच वर्षात बदलला असा प्रश्न कुणी कुठेही केला तर सहजच प्रत्येकाच्या मुखावर एकच नाव येते ते म्हणजे अमळनेर शहर आणि याचे खरे श्रेय जाते ते भूमिपुत्र अनिल पाटील यांना.
हा घ्या शाश्वत विकास
अनिल दादाच्या कर्तुत्वाने भव्य असे महसुलचे प्रांत कार्यालय व तहसील कार्यालयाच्या इमारतीचे काम वेगाने सुरू असून त्याशेजारी च सर्व शासकीय कार्यालयासाठी प्रशासकीय इमारतीचे कामही होत आहे,पंचायत समितीच्या इमारतीचे नुकतेच भूमिपूजन होऊन प्रत्यक्ष कामही सुरू झाले असून यासोबत एस टी डेपो चेही भूमिपूजन होऊन तेही काम सुरू होणार आहे.युवकांच्या दृष्टीने आणि त्यांच्या क्रीडा गुणांना वाव देण्याचा मोठ कार्य अनिल दादाने केले आहे ते म्हणजे मांरवड रस्त्यावरील निधी अभावी अडगळीत पडलेल्या क्रीडा संकुलास त्यांनी निधी आणून चालना दिली. आता पुन्हा ६.६६कोटी निधी मंत्रिमंडळाने मान्यता दिल्याने क्रीडा क्षेत्रासाठी पर्वणी ठरणार आहे.
शहरातील रस्ते चकचकात
याशिवाय शहराच्या मध्यवर्ती भागात जवळपास सारेच रस्ते नवीन झाले असून विशेष करून मुख्य बाजारपेठेत एकाही रस्त्यांचे काम आज शिल्लक नाही .वस्त्या आणि कॉलनी परिसरातील अनेक रस्ते देखील नवीन होऊन काही रस्त्यांची कामे वेगाने सुरू आहेत.शहराच्या चारही बाजूला डी. पी. रस्त्यांचे काम वेगाने सुरू आहे.शहराच्या मुख्य रस्त्यावर एकाच रंगाचे जंबो पथदिवे लगल्याने शहराच्या सौंदर्यात वाढ झाली आहे. यासोबतच मंग्रलग्रह मंदिरासाठी २५ कोटी निधी मिळविल्याने लवकरच मंदिर परिसराचा प्रचंड कायापालट होऊन अनपेक्षित बदल होणार आहे.
१९७ कोटींची दररोज पाणी देणारी योजना
शहरासाठी नगरपरिषदेच्या माध्यमातून १९७ कोटींची दररोज पाणी देणारी नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर करून लवकरच शहरवासीयांना दररोज पाणी पुरवठा करण्याची व्यवस्था अनिल दादाने केली आहे.शहराच्या उद्योगाला चालना देणारी ही योजना आहे.
उद्यान सुशोभीकरणाने विरंगुळा
शहरातील एकमेव मोठे उद्यान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज उद्यानास ८० कोटी निधी देऊन नूतनीकरणासह सुशोभीकरण होऊन हिरवेगार नंदनवन येथे साकारल्याने हे उद्यान छोटे पर्यटन केंद्र आणि मॉर्निंग वॉक साठी येणाऱ्यांना पर्वणी ठरले आहे.याशिवाय इतर लहान उद्यान सुशोभीकरण असेल,नंदनवन साकारलेल्या अंबरीश महाराज टेकडीवर नवीन रस्ता असेल किंवा दगडी दरवाजाचे सुशोभीकरण असेल ही सारी कामे दादांनी पूर्ण केलेली आहेत.
वाहतूक कोंडी फोडून घेताय मोकळा श्वास
नवीन दगडी दरवाजाच्या निर्मितीमुळे या मुख्य रस्त्यावरील कोंडलेला श्वास नक्कीच मोकळा झाला असून येथील वाहतूकही सुरळीत झाली आहे.नुकतेच टॅक्सी स्टँडसाठी पिकअप शेड निर्माण केल्याने प्रवासी व चालकांना उन वारा व पाऊस पासून सरक्षन कवच मिळाले आहे. याव्यतिरिक्त शहरात विविध ठिकाणी योगा हॉल,गटार बांधकाम, खुला भूखंड सुशोभित करणे,अभ्यासिका आदी कामे करून नागरिकांची सोय करण्यात आली आहे. आणि यामुळेच शहरात सुरू असलेल्या प्रचार फेऱ्यांना मोठा प्रतिसाद लाभत असल्याचेही ते म्हणाले.