अमळनेर (प्रतिनिधी) येथील प्रताप महाविद्यालय मधील स्नेहल आणि रोहित यांनी टेनिस स्पर्धेत विजेतेपद पटकावले. त्यांच्या यशाचे कौतुक केले जात आहे.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अंतर्गत जळगाव जिल्हा क्रीडा संकुलात आंतर विभागीय टेनिस स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. सदर स्पर्धेमध्ये जळगाव, नंदुरबार, धुळे आणि एरंडोल विभागाचे टेनिसपटू सहभागी झालेले होते. आंतरविभागीय टेनिस स्पर्धेमध्ये एरंडोल विभाग प्रथम येऊन प्रतापच्या खेळाडूंनी निर्विवाद विजय प्राप्त केले. प्रताप महाविद्यालयाच्या एसवायबीएचा टेनिस खेळाडू रोहित सर्जेराव पाटील व एफवाय बीएस्सीची स्नेहल पाटील यांनी विजेतेपद फटकावले. दोन्ही टेनिसपटूंची पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ टेनिस स्पर्धेसाठी स्तुत्य अशी निवड झाली. त्यांचे संस्थेचे अध्यक्ष जितेंद्र झाबक, उपाध्यक्ष माधुरीताई पाटील, जितेंद्र देशमुख, विश्वस्थ वसुंधरा लांडगे, कार्याध्यक्ष डॉ. संदेश गुजराथी, कार्योपाध्यक्ष निरज अग्रवाल, जेष्ठ संचालक हरी भीका वाणी,संचालक योगेश मुंदडा, डॉ. अनिल शिंदे, प्रदीप अग्रवाल, ज्येष्ठ संचालक विनोद पाटील, कल्याण पाटील, खा. शि. मंडळ सचिव व प्राचार्य डॉ. अरुण बी. जैन, सहसचिव व अधिसभा सदस्य डॉ. धीरज वैष्णव, उपप्राचार्य प्रा.डॉ. कल्पना पाटील, प्रा. पराग पाटील, डॉ. अमित पाटील, प्रा. डॉ. विजय मांटे, प्रा. डॉ. विजय तुंटे, डॉ. योगेश तोरवणे, वरिष्ठ जिमखाना समन्वयक व अधिसभा सदस्य प्रा. डॉ. संदीप नेरकर, डॉ. मुकेश भोळे, क्रीडा संचालक प्रा.डॉ.सचिन पाटील, प्रा. अमृत अग्रवाल, प्रशिक्षक प्रा.विजय शिंदे, कुलसचिव राकेश निळे, क्रीडा शिक्षिका प्रा.अर्चना सचिन पाटील, प्रशांत देवकाते यांनी कौतुक केले.