अमळनेर (प्रतिनिधी) एचआयव्हीसह जीवन जगणाऱ्या बालकांना सकस आहार किराणा किट वाटप रोटरी क्लब आणि आधार संस्थेच्या संयुक्त उपक्रमाने वाटप करण्यात आले.
ओमकार अंध केव्हीके सोसायटी मुंबई यांच्या कडून किशोर देवरे यांनी ५० सकस आहार किट त्यांच्या स्वतःच्या खर्चातून अमळनेर येथे पार्सलद्वारे पोहचवले. मकसुद भाई बोहरी यांच्या कडून ३० प्रोटीन किट देण्यात आले. आधार बहुउद्देशीय संस्था व रोटरी क्लब अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने एचआयव्हीसह जगणाऱ्या मुलांना व मुलींना व गरजु व्यक्तींना सकस आहार कीट व प्रोटीन किटचे वाटप अंकुर सेवा सेतू अंतर्गत करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मकसुद भाई बोहरी होते. रोटरी क्लबचे अध्यक्ष ताहा बुकवाला व रोटरी क्लबचे सिनियर मेंबर चेलाराम सैनानी व डॉ. दिलीप भावसार यांची उपस्थिती होती. यशस्वितेसाठी आधार संस्थेचे टीम मेंबर तौसिफ शेख, दीपक विश्वेश्वर, उर्जिता शिसोदे, पुनम पाटील यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय कापडे यांनी केले. आभार ताहा बुकवाला यांनी मानले.