अमळनेर (प्रतिनिधी) प्रधानमंत्री सुरक्षा रक्षक एसरीजी कमांडो असलेला अमळनेराचे सुपुत्र अरविंद बैसाणे यांना पदोन्नती प्रधान करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांचे सर्वत्र स्वागत केले जात आहे.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे सुरक्षा रक्षक एसपीजी कमांडो म्हणून चार वर्ष दिल्ली येथे एमपीओ सेवार्थ असलेले अमळनेरचे सुपुत्र अरविंद बैसाणे यांना विभागामार्फत पदोन्नती प्रदान करण्यात आली आहे. सध्या नागपूर येथे कार्यरत असलेले कमांडो यांना त्यांच्या सीआयएसएफ विभागामार्फत कर्तव्य सेवानिष्ठ व उत्कृष्ट कामगिरीबद्दल संरक्षण विभागामार्फत पदोन्नती प्रदान करण्यात आली आहे. त्यांच्या या यशा नंतर संपूर्ण अंमळनेर तर्फे व परिवारा मार्फत कौतुकाच्या वर्षाव करण्यात आले आहे. तसेच ते धनदाई माता एज्युकेशन महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत.