अमळनेर (प्रतिनिधी) माजी आमदार शिरीष चौधरी यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज केल्याने त्यांना भाजपने पक्षातून निष्कासित केल्याचे पत्रक प्रदेश भाजपचे कार्यालय सचिव मुकुंद कुलकर्णी यांनी ८ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध केले आहे.
शिरीष चौधरी हे २०१९ ला भाजपकडून विधानसभा निवडणूक लढले होते. तसेच त्यांनी लोकसभेत देखील भाजपचा प्रचार करणार असल्याचे सांगितले होते. मात्र २०२४ च्या विधानसभेत उमेदवारी अर्ज भरल्याने त्यांच्या बंडखोरीची चर्चा झाली होती. महायुतीचे मंत्री अनिल पाटील यांनी ते भाजप सदस्य नसल्याचे सांगितले होते. मात्र भाजपने आजच त्यांना निष्कासित केल्याचे पत्र प्रसिद्ध केले आहे.
बनावट पत्र ः माजी आमदार शिरीष चौधरी
आम्ही भारतीय जनता पार्टीचे सहयोगी सदस्य म्हणून सरकारला पाठिंबा दिला होता. आम्ही भाजप चे सदस्य नव्हतो. त्याचप्रमाणे नुकतेच भाजप ने ४० जणांना पक्षातून निलंबित केले त्यात शिरीष चौधरी यांचे नाव नव्हते म्हणजे आजचे पत्र बनावट आहे असा दावा माजी आमदार शिरीष चौधरी यांनी केला आहे.