अमळनेर( प्रतिनिधी)-पांझरा नदीवरील अक्कलपाडा प्रकल्पाचे आवर्तन काल दि 13 रोजी सोडण्यात आले असून लवकरच हे पाणी अमलनेर तालुका हद्दीतील गावांपर्यंत पोहोचणार असल्याने तालुक्यातील पांझरा काठावरील गांवाना टंचाई परिस्थितीत मोठा फायदा होणार आहे.राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांच्या मार्गदर्शनाने व आ सौ स्मिता वाघ यांच्या प्रयत्नांनी हा दिलासा मिळाला आहे.
तालुक्यात भीषण दुष्काळी परिस्थिती असल्याने अक्कलपाडा प्रकल्पातील पाणी नुकतेच अक्कलपाडा प्रकल्पाचे पाणी अमळनेर तालुक्याच्या सिमेवरिल निम येथील पांझरा-तापी संगमापर्यन्त सोडण्यात यांवे या मागणीसाठी जिल्हा परिषद सदस्य संगीता भील,संजय पाटिल,काशीनाथ माळी, चंद्रसेन पाटिल,प्रवीण माळी, संजय पाटिल यानी आ सौ स्मिता वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांची भेट घेतली होती,सदर मागणी मान्य होवून आवर्तन सोडण्याचे आदेश काल झाले होते प्रकल्पाचे पाणी निम पर्यन्त सोडन्यात आले आहे.यामुळे तालुक्यातील जवखेड़ा,मांडळ, मुडी, वावडे, मुडी, लोण, भरवस,ब्राम्हणे, भिलाली, शहापुरा,एकतास ,एकलहरे इत्यादि गांवमधील पिण्याच्या पाण्याची समस्या सुटली असून नागरिकांना दिलासा मिळाला आहे.याबद्दल परिसरातील जनतेने राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीष महाजन व आ स्मिता वाघ यांचे आभार व्यक्त केले आहेत.