जाहीरनामा प्रकाशन प्रसंगी स्मिता वाघांची शिरीष चौधरींवर टिका
अमळनेर (प्रतिनिधी) बोलायला संस्कृती, मर्यादा असली पाहिजे, पाच वर्षांपूर्वी हातगाड्यांवर दारू मिळायची. यामुळे ६० तरुणांचा बळी गेला आहे. अशी परिस्थिती आता नकोय, ही संस्कृतीच हद्दपार करायची आहे, अशी टिका खासदार स्मिता वाघ यांनी केली. यासाठी तरुणांना काम देण्यासाठी औद्योगिक दृष्ट्या मोठी एमआयडीसी असावी आणि त्यासाठी लागणारे पाणी पाडळसरे धरणातून उपलब्ध होईल यासाठी आम्ही कटिबद्ध राहू असे अश्वासन खासदार स्मिताताई वाघ यांनी दिले.
महायुतीच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या जाहीरनामा प्रकाशन प्रसंगी उमेदवार अनिल पाटीसह खासदार स्मिताताई वाघ या पत्रकारांशी बोलत होत्या. त्या म्हणाल्या, विधानसभा मतदार संघात जातीजातीचे राजकारण केले जात आहे. मला धमक्या येत आहेत. आम्ही मेलेल्या आईचे दूध प्यालेलो नाही हिम्मत असेल तर समोर येऊन धमक्या द्या माझ्यापुढे हजार कार्यकर्ते उभे राहतील अशा कडक शब्दात स्मिता वाघ यांनी विरोधक समाचार घेतला.
गत काळातील घटना अथवा वक्तव्य व्हायरल करून महायुतीत गैरसमज निर्माण करण्याचे काम विरोधक करीत आहेत. बोलायला संस्कृती , मर्यादा असली पाहिजे पाच वर्षांपूर्वीची परिस्थिती आता नकोय , हातगाड्यांवर दारू मिळायची ६० तरुणांचा बळी गेलाय. औद्योगिक दृष्ट्या मोठी एमआयडीसी असावी आणि त्यासाठी लागणारे पाणी पाडळसरे धरणातून उपलब्ध होईल यासाठी आम्ही कटिबद्ध राहू असा वादाही वाघ यांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेसचा राज्याचा जाहिरनामा अजित पवार यांनी ऑनलाईन जाहीर केल्यावर त्यांनी प्रत्येक उमेदवाराच्या स्थानिक पातळीवर जाहिरनामा प्रसिद्ध करण्याचे आदेश दिले. अमळनेर मतदार संघाचा जाहीरनामा प्रसिद्ध करताना व्यासपीठावर मंत्री अनील पाटील, खासदार स्मिता वाघ, शिवसेना तालुका प्रमुख प्रथमेश पवार, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष भागवत पाटील, शहराध्यक्ष मुख्तार खाटीक, भाजप तालुकाध्यक्ष हिरालाल पाटील, शहराध्यक्ष विजय पाटील, माजी तालुकाध्यक्ष बाळासाहेब पाटील , संजय कौतिक पाटील , माजी जिप सदस्या जयश्री पाटील , बाजार समिती सभापती अशोक पाटील, अॅड. व्ही. आर. पाटील, महेंद्र बोरसे, प्रा. सुरेश पाटील, प्रा. मंदाकिनी भामरे, आशा चावरीया, यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
फोन पेवर पैसे टाकून दारू पाजणारी संस्कती नको
यावेळी मंत्री अनिल पाटील म्हणाले की फोन पे च्या माध्यमातून पैसे टाकून दारू प्या असे सांगणारी संस्कृती अमळनेरची नाही. आमचा भूमिपुत्र हाच आमचा जातीधर्म असं तालुक्याने दाखवून द्यायला सुरुवात केली आहे. माझ्याकडून काही छोट्या चुका झाल्या असतील तर माफी मागतो. गावागावातील गैरसमज दूर करा. विकास कामांचा जाहिरनामा प्रसिद्ध केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
दुष्काळ कसा जाहीर होतो, हे विरोधकांना माहीत नाही
अमळनेर तालुका दुष्काळी जाहीर केला नाही याला मंत्री जबाबदार आहे, असा आरोप होत आहे. या प्रश्नावर ते म्हणाले की दुष्काळ कसा जाहीर होतो हे विरोधकांना माहीत नाही. मी पीक विमा, अनुदान, मागील बाकी असे सुमारे साडेसहाशे कोटी रुपये अमळनेर तालुक्याला मिळवून दिले. भूजल पातळी वाढली आहे. शेतकऱ्यांची उत्पन्न क्षमता वाढली तर पीक विमा जास्त मिळतो, यात शेतकऱ्यांचा फायदा आहे, असा खुलासा त्यांनी केला. माजी आमदार शिरीष चौधरी हे भाजपचे सदस्यच राहिले नाहीत. भाजपशी त्यांचा काहीच संबंध राहिलेला नाही असेही स्पष्टीकरण अनिल पाटील यांनी केले.
साहेबराव दादा कोणाचा गेम करतील सांगता येत नाही
माजी आमदार साहेबराव पाटलांचा आपण गेम केला असा आरोप आपल्यावर होत आहे या प्रश्नावर मंत्री अनिल पाटील म्हणाले की साहेबराव पाटील हुशार माणूस आहे. त्यांचा कोणी गेम करू शकेल असा कोणी नाही. उलट ते निवडणुकीत कोणाचा गेम करतील हे सांगता येत नाही.