अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर विधान सभा मतदार संघात सोळा उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यात माघारीच्या अंतिम मुदत अखेर चार जणांनी माघार घेतली आहे.आता बारा उमेदवार रिंगणात असून त्यात तीन उमेदवार पक्षांतर्गत तर नऊ अपक्ष उमेदवार आहेत.
यात डॉ.अनिल नथु शिंदे (पंजा ), अनिल भाईदास पाटील (घड्याळ ), सचिन अशोक बाविस्कर (हत्ती ), अपक्ष म्हणून अनिल भाईदास पाटील (केक ), अमोल रमेश पाटील (ग्रामोफोन), छबिलाल लालचंद भिल (दूरदर्शन ), निंबा धुडकू पाटील ( किटली ), प्रतिभा रवींद्र पाटील (कुकर ), यशवंत उदयसिंग मालची (विजेचा खांब ), रतन भानू भिल (शिट्टी), शिरीष हिरालाल चौधरी (बॅट), शिवाजी दौलत पाटील (ऑटो रिक्षा ) असे एकूण बारा उमेदवार आहेत.उद्यापासून प्रचाराला जोर येणार असून निवडणूक रिंगणात उमेदवारांना चांगलाच कस लागणार असल्याचे बोलले जात आहे.
माघार घेतलेले उमेदवार कैलास दयाराम पाटील, अशोक लोटन पवार, जयश्री अनिल पाटील, प्रथमेश शिरीष चौधरी.