अमळनेर (प्रतिनिधी) इयत्ता १० वीच्या परीक्षेत महाराष्ट्रातून गणित विषयात १०० पैकी १०० गुण मिळवून प्रथम आल्याबद्दल येथील सेंट मेरी शाळेची विद्यार्थिनी राजनंदिनी दीपक चव्हाण हिला राज्य शिक्षण मंडळाने १० हजार रुपयांचे पारितोषिक दिले आहे.
राजनंदिनी दीपक चव्हाण हिला मार्च २०२४ मध्ये झालेल्या १० वीच्या परीक्षेत एकूण ९७.४० टक्के आणि गणित विषयात १०० गुण मिळाले. गणित विषयात ती राज्यात प्रथम आल्याने महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे विभागीय सचिव एम. एस. देसले यांनी नुकतेच तिला स्व अनिरुद्ध अशोक देसाई पारितोषिक १० हजार रुपयांचे दिले आहे. तिला साळुंखे मॅथस अकादमीचे महेंद्र पाटील , तिचे आईवडील यांचे मार्गदर्शन लाभले. तिच्या या यशाबद्दल तिचा सत्कार करण्यात आला.