अमळनेर( प्रतिनिधी) येथील मतदार संघातील आमदार शिरीष चौधरी यांच्या अथक प्रयत्नातून अमळनेर व पारोळा तालुक्यातील गावामध्ये निधीची सतत बरसात होत असल्याने विकासाची गंगा अवतरत असून विकासाचा अनुशेष भरून निघत आहे, आता पुन्हा मतदारसंघातीलग्रामपंचायत,रस्ताकॉंक्रीटीकरण,गटार,सभागृह, सभामंडप,स्मशानभुमी, प्रवेशद्वार, शौचालय इ. विकास कामांसाठी 10 कोटी 60 लाख एवढा भरघोस निधी गावांतर्गत आवश्यक कामांसाठी उपलब्ध झाला असल्याची माहिती आमदार शिरीषदादा चौधरी यांनी दिली आहे.
यासाठी मुख्यमंत्री ना देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री ना पंकजाताई मुंडे, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे विशेष सहकार्य लाभल्याने आ चौधरी यांनी त्यांचे आभार व्यक्त केले आहेत.सदर निधीतून खालील प्रमाणे विकास कामे मार्गी लागणार आहेत.
ग्रामपंचायत इमारत:-हिरापूर, दोढवद, भोलाने, सुमठाणे, खापरखेडा, झाडी, कलाली.गाव प्रवेशद्वार:-कपिलेश्वर मंदिर निम, निमझरी, नगाव खुर्द, रडावण, हिंगोना सीम, जुनोने, दगडी सबगव्हाण, मुगसे,धानोरा, एकरुखी, लोणे, मेहेरगाव, खेडी(खवशीं).संरक्षक भिंत:मुंगसे,दोधवद, पिंगळवाडे, अमळगाव.पेव्हरब्लॉक बसविणे:-भरवस, झाडी, कळंबु येथे हनुमान मंदिर परिसर व राम मंदिर चौक.समाजमंदिरदेवमढी:पुनगाव,मुडी(हिंगोणे),पाडळसे,महाळपुर,मुंगसे,ढेकू खु, शेळावे, चोंदी (बोदर्डे), ढेकू, चिमनपुरी, निंम, खेडी व्यव हारदाळे,खापरखेडा, करणखेडा,कामतवाडी, कळंबे,तांबोळे, निमझरी, दापोरी,बहादरपूर,सारबेटा खु, गलवाडे बु.गावातंर्गत रस्ता काँक्रीट,गटारी, सभामंडप, सभागृह, शौचालय, स्मशानभूमी करणे:-अमळगाव स्मशान भूमी साठी 20 लाख, इंदापिंप्री,जळोद, मुडी, एकरुखी, जळोद,लोण बु, धावडे, निसर्डी, पाडळसे, जैतपीर, भिलाली, वसंतनगर, सारबेटा बु,पिपळकोठा, खवशीं,नगाव खु,करणंखेडा, तांबोळे, एकतास,शिरसाळे, बहादरपूर, जळोद,कळमसरे, तांदळी, निमझरी,पाडळसे, सावखेडा,जिराळी, जानवे, मालपूर, गलवाडे, जवखेडे, शहापूर येथे गोरेश्वर मंदिर परिसर काँक्रीटीकरण करणे,दळवेल, निम, शिरूड,पिळोदा, पातोंडा, मारवड,शेवगे बु,उत्रन, पातोंडा,मेहेरगाव, निमझरी, दहिवद,दगडी सबगव्हान, बाम्हणे, पिपळें खु, गडखाब, खेडी खु,मोढाळें, हिवरखेड तांडा, दगडी सबगव्हान, हिंगोणा खु,पिंपळी, मोढाळें, आर्डी अनोरे,पाडसे, खवशी,रत्नापिंप्री, देवगाव देवळी, शिरसोदे, मांडळ, रणाईचे, भरवस, मुडी प्र डा, शहापुर, नगाव खु, धार, जवखेडे, ढेकू सिम, वावडे, गांधली, गलवाडे, सारबेटे, डांगरी, निभोरा, कोळपिंप्री, जानवे, गडखाब, टाकरखेडा, दळवेल,शिरूड, दहिवद,झाडी, भिलाली, ढेकू खु, मंगरूळ, शेवगे बु, जैतपीर,नगाव बु, आबापिंप्री,आदीप्रमाणे विकास कामे होणार असून कार्यकारी यंत्रणा सार्वजनिक बांधकाम विभाग राहणार असल्याचे आमदारांनी म्हटले आहे आहे. यामुळे ग्रामीण भागात आवश्यक ती विकासकामे मार्गी लागणार असून याचा लाभ ग्रामस्थांना होणार आहे.तसेच ग्रामीण भागातील गावांतर्गत सुविधांचा अनुशेष भरून काढण्यासाठी आ शिरीष चौधरी यांनी शासनाकडे अजून प्रस्ताव दाखल केला असून यात अनेक गावांमध्ये ग्रामपंचायत, सभामंडप, सभागृह, काँक्रीट रस्ता, गटारी, प्रवेशद्वार, आदिवासी समाजमंदिर,संरक्षक भिंत, स्मशानभूमी, दफनभूमी, आदी कामे प्रस्तावित आहे, लवकरच त्यांना मंजुरी मिळेल आणि विकासाचा आलेख अजून वाढेल असा विश्वास आ चौधरी यांनी व्यक्त केला आहे.