पारोळा तालुक्यातील गावांमध्ये महायुतीबाबत रोष, महाविकास आघाडीचे डॉ.अनिल शिंदे यांना साथ देण्याचे आश्वासन

मा.आ. साहेबराव पाटील डॉ. शिंदेच्या प्रचारात सक्रियपणे सहभागी होण्याचे सुतोवाच

अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर विधानसभा मतदारसंघातील पारोळा तालुक्यातील गावांमध्ये महायुतीबाबत रोष असून महाविकास आघाडीचे डॉ.अनिल शिंदे यांना साथ देण्याचे आश्वासन मतदार देत त्यांच्या प्रचार रॅलीला मतदारांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. तर राजवड येथे माजी आमदार साहेबराव पाटील यांनी डॉ. शिंदे व प्रचार रॅलीचे जोरदार स्वागत करत ते पाठीशी असल्याचे स्पष्ट केले. यावेळी सक्रियपणे डॉ. शिंदे यांच्या प्रचारात सहभागी होणार असल्याचे सूतोवाच त्यांनी दिले.

सध्याच्या सरकारला जनता कंटाळली असून राज्यात अनेक महत्वाचे प्रश्न असताना फोडाफोडीचे राजकारण, ईडी सीबीआयचा धाक दाखवून लोकप्रतिनिधींना जेलमध्ये टाकले. शेतकऱ्यांच्या समस्या, मालाला हमीभाव नाही, बेरोजगारी, जुनी पेन्शन या विषयांवर कोणतेही पाऊल सरकारने न उचलल्याने ग्रामीण जननेत मोठा रोष आहे. महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार, डॉ. अनिल नथ्थू शिंदे यांचा प्रचार जोरात सुरू असून त्यांच्या उमेदवारीला मतदारांचा मोठा पाठिंबा मिळत असून, काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार गटाचे राष्ट्रवादी पक्ष, उद्धव बाळासाहेब ठाकरे पार्टीच्या कार्यकर्त्यांनी या प्रचारात सक्रिय सहभाग घेतला आहे. यावेळी श्याम पवार, धनगर आण्णा पाटील, प्रा. सुभाष जीभाऊ पाटील, प्रताप पाटील, शरद पाटील, नीलकंठ तात्या, सचिन पाटील, अनंत निकम, पराग पाटील, ए. डी. पाटील, शरद पाटील, हरिभाऊ मारवडकर , बाळासाहेब पाटील, महेश पाटील, दिनेश पवार, उमेश पाटील, बंटी पाटील, राकेश बिऱ्हाडे, वाल्मीक पाटील, रवींद्र पाटीलसह पदाधिकारी उपस्थित होते. तसेच शेळावे येथील संजू बिराडे, राकेश बिराडे, छोटू पाटील, नवल पाटील, योगेश पारधी, चिखलोड येथील वाल्मीक पाटील, जगदीश पाटील, सिताराम शिंदे, ज्ञानेश्वर पाटील, भाऊसाहेब पाटील, संदीप शिंदे, राजू वडर, धाबे येथील मनोहर पवार, विकास पाटील, राजाराम पाटील, जितेंद्र पाटील, श्याम मोरे, रमेश सोनवणे, लोटन भील, तांबोडे गावातील किशोर भिल, अर्जुन भिल, भाऊसाहेब भिल, भैया भिल, येथील हिरापूर जितू पाटील, गणेश पाटील, अभय पाटील, राकेश सोनवणे, उत्रड येथील दामू पाटील, भैया पाटील, तातू पाटील, सुधाकर भिल, अनंत भिल, पिंटू भिल, जितेंद्र भिल, मोहाडी गावच्या सरपंच नगीना अरमान, सुनिल पाटील, शहादात खाटिक, बाळू नाईक, दहिगांव येथील नंदू पाटील, रमेश पाटील, सतीश ठाकरे, राजवड येथे माजी आमदार साहेबराव धोंडू, रामराव पाटील, सोनू पाटील, मनोज पाटील, राज पाटील, प्रथमेश पाटील, अशोक पाटील, पिंटू पाटील, शांताराम पाटील, बाळू पाटील, मधुकर सयाजी, दगडू पाटील, शिरीष पाटील, संजय रतन पाटील, राकेश पाटील, मनोज पाटील, धर्मेंद्र पाटील, कैलास पाटील, खेडीढोक येथे कोमल पाटील, राहुल पाटील, धीरज पाटील, आबा पाटील, आकाश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *