अमळनेर (प्रतिनिधी) तब्ब्ल सहा वर्षानंतर दीपावलीच्या शुभ मुहूर्तावर चित्रपट गृह सुरू करण्यात आले. चित्रपट प्रेमिसाठी ही मनोरंजनाची पर्वनी ठरली आहे.
मिडटाऊन येथे कलावती गोकलाणी यांच्या हस्ते एसएस सिनेप्लेक्सचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी उद्योगपती सरजु गोकलाणी , सिनेप्लेक्सचे मालक संजय सुराणा उपस्थित होते. अमळनेरातील अखेरचे चित्रपटगृह तंबोली टॉकीजची जागा उद्योगासाठी घेतल्यानंतर सरजु गोकलाणी यांनी प्रेक्षाकांच्या, रसिकांच्या आवडीला दाद देत याच ठिकाणी आधुनिक चित्रपट गृह उभारून रसिकांची स्वप्ने पूर्ण केले जातील, असा निश्चय केला होता. सरजु गोकलाणी यांच्या सहकार्याने भुसावळचे संजय सुराणा यांनी एसएस सिनेप्लेक्स उभारले. वातानुकूलित आरामदायी बैठक व्यवस्था , मोठा पडदा , चित्राची गुणवत्ता आणि स्पष्ट आवाज असे वैशिष्ट्य असलेले दोन प्लेक्स प्रत्येकी १४८ ची बैठक व्यवस्था असलेली उभारण्यात आली आहेत.
पहिल्याच दिवशी दोन चित्रपट
पहिल्याच दिवशी १ रोजी सिंगम अगेन, भुलभुलैया ३ हे दोन चित्रपट दाखवण्यात आले. यावेळी पारोळा , धरणगाव , बेटावद , चोपडा व परिसरातून प्रेक्षक चित्रपट पाहण्यासाठी आले होते. पुन्हा अमळनेरात चित्रपटगृह सुरू झाल्याने अनेकांनी आनन्द व्यक्त केला.