अमळनेर मतदारसंघात आमदार रिपीट न करण्याची परंपरा यंदाही राहणार कायम

डॉ. अनिल शिंदे समर्थकांचा विश्वास

 

अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर मतदारसंघात आमदार रिपीट न करण्याची परंपरा असून ती या निवडणुकीतही कायम राहणार असल्याचा विश्वास डॉ. शिंदे समर्थकांनी व्यक्त केला आहे.

अमळनेर तालुक्यातील जनतेने शिरीष चौधरी आणि अनिल पाटील दोघांची कारकीर्द अनुभवली असून तालुक्याचा शाश्वत विकास न झाल्याने तिसरा पर्याय म्हणून डॉ. अनिल शिंदे यांना पसंती असल्याचे समर्थकांकडून बोलले जात आहे.तर माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या कार्यकाळात कोणतीही विकासकामे झाली नाहीत. ठराविक दोन तीन कामांच्या नावावर मते मागण्याचा त्यांचा प्रयत्न असून गेली साडेचार वर्ष ते तालुक्यातून गायब होते. मात्र निवडणूक लागताच संपूर्ण परिवार तालुक्यात हजर झाला आहे. त्यांना कंटाळूनच तालुक्यातील जनतेने परत पाठवत भूमिपुत्र म्हणून भावनिक साद घालणाऱ्या अनिल पाटील यांना निवडून दिले होते. मात्र त्यांनीही दोन वेळा पळून जात अमळनेरच्या जनतेचा विश्वास घात केला. निवडून आल्यावर त्यांचे बोलणे चालणे बदलल्याने त्यांना निवडून देण्यासाठी परिश्रम करणारे खरे कार्यकर्ते त्यांच्यापासून दूर गेले. खा. शरदचंद्र पवार यांच्याशी व जनतेशी गद्दारी करत कॅबिनेट मंत्रिपद तर मिळवले मात्र तालुक्यातील जनतेच्या विकासासाठी त्याचा कोणताही उपयोग केला नसल्याचे जनताजनार्दन बोलत आहे. बाजूच्या चाळीसगाव तालुक्यात दुष्काळ जाहीर होतो मात्र मदत व पुनर्वसन मंत्र्याला स्वतःचा तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करत येत नाही, हेच त्यांचे खरे अपयश आहे.

रुग्ण सेवा करणारा खरा भूमिपुत्र डॉ. अनिल शिंदे कोरोना काळात जेव्हा तालुक्यातील जनतेला खरी गरज होती. तेव्हा जनतेची सेवा करणारे डॉ. अनिल शिंदे हेच खरे भूमिपुत्र असल्याचे गावागावातील जनता बोलत आहे. सडेतोड व स्पष्टवक्ते असलेल्या डॉ. अनिल शिंदे यांच्या मनात कोणतेही कपट नाही, त्यामुळे ते खरोखर तालुक्याचा शाश्वत विकास करतील असा विश्वास समर्थक व्यक्त करीत आहेत. तालुक्यातील खेडोपाडी गोरगरीब जनतेची डॉ. शिंदे यांना पसंती मिळत आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *